Home » माझा बीड जिल्हा » सिमा ओस्तवाल यांना पुरस्कार प्रदान..

सिमा ओस्तवाल यांना पुरस्कार प्रदान..

सिमा ओस्तवाल यांना पुरस्कार प्रदान..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सिमा मनोज ओस्तवाल यांना सत्यशोधक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रोहयो मंत्री ना. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. 27 सप्टेंबर 2019 रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सत्यशोधक प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना सत्यशोधक पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सिमा मनोज ओस्तवाल यांनी ग्रामीण भागातील युवतींना मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी सक्षम केले आहे. तसेच आज पर्यंत शेकडो मुलींना नाममात्र दरात ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब विद्यार्थ्यांना आत्ता पर्यंत 1 लाख मोफत वह्या वाटप केल्या आहेत. त्याच बरोबर दिवाळी सणा निमित्त वंचित, उपेक्षीत, गरीबांच्या घरी जावून त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी त्यांना किराणा सामानाचे वाटप केले आहे. सत्यशोधक प्रतिष्ठानने त्यांच्या या कार्याची दखल घेवून रोहयो मंत्री ना. जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक थोरात, अरूण डाके, विलास बडगे, दीनकर कदम, गणेश वाघमारे, दादाराव रोकडे, नितीन धांडे, अरूण बोंगाने, नगरसेवक रविंद्र कदम, गणेश वाघमारे, दीपक थोरात आदी मान्यवरांसह सत्यशोधक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करुन पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पुरस्कारार्थींचीही यावेळी उपस्थिती होती. सीमा ओस्तवाल यांचे हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे

*चौकट*

पुरस्कारातून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते- सिमा ओस्तवाल
गेल्या आठ वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात कार्य करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु त्या अडचणींना बाजुला सारत मी ग्रामीण भागातील मुली आपल्या पायावर उभ्या कशा राहतील या उद्देशाने त्यांना ग्रामीण भागातून जावून मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्यासाठी हातभार लावला. त्याच प्रमाणे गरीब विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांना शालेय साहित्य वाटप केले, सिरसमार्ग परिसरातील गावातील नागरीकांना दुष्काळात पाण्यासाठी हाल होत असतांना त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. मी करत असलेल्या कार्यासाठी सत्यशोधक प्रतिष्ठानने माझी या पुरस्काराठी निवड केली हा पुरस्कार राज्याचे रोहयो मंत्री ना.जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला. या पुरस्काराने प्रेरित होवून भविष्यात यापेक्षाही अजून मोठे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असे मनोगत सौ. सिमा मनोज ओस्तवाल यांनी पुरस्कार प्रदानानंतर व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published.