खंडोबाचे आशीर्वाद पाठीशी – आ.देशमुख
डोंगरचा राजा / आँनलाईन
– आमदार देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ,उदघाटन उत्साहात
आज माजलगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार आर टी देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडले याप्रसंगी मोगरा येथील जागृत देवस्थान असलेल्या खंडोबा मंदिर येथील रस्ता कामाचे उद्घाटन करताना खंडोबाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली
आज आज दिनांक 21 रोजी आमदार आर टी देशमुख यांच्या हस्ते माजलगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले यात लवुळ येथील राज्य रस्ता क्रमांक 55 वरील जीवनापूर -पारगाव -उमरी -लोणगाव -पाथरूड- लवूळ- परडी देवगाव- कवडगाव रस्ता सुधारणा 22 कोटी गावांतर्गत एकूण नऊ सिमेंट रस्त्यासाठी 26 लक्ष 91 हजार, सावरगाव -किट्टी आडगाव -राजेगाव रस्ता सुधारणा सहा कोटी, 87 लक्ष मोगरा खंडोबा मंदिर ते मोगर लिंग फाटा रस्ता डांबरीकरण 30 लक्ष, मोगरा गावांतर्गत स्मशानभूमी शेड, रामा 222 ते रेनापुरी, वाघोरा शहाजनपुर, नाखलगाव आलापुर, रामा 222 ते शेलापुरी, रामा 61 ते यश पब्लिक स्कूल जुना पातृड पांदन रस्ता सुधारणा कामांचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले याप्रसंगी माजी सभापती नितीन नाईकनवरे, भाजपा तालुकाध्यक्ष हनुमान कदम, वडवणी तालुका अध्यक्ष राम सावंत उपनगराध्यक्ष प्रतिनिधी अरुण मुंडे, नगरसेवक नारायण होके, विनायक शिंदे,माजी उपनगराध्य दीपक मेंढके, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज जगताप,हनुमानराव डोईजड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार आर टी देशमुख यांनी माजलगाव मतदारसंघात गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला मतदारसंघात रस्ते विकासाची प्रचंड कामे झाली आहेत पाच वर्षांपूर्वी माजलगाव मतदार संघातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे होते चांगल्या स्थितीत एकही रस्ता नव्हता आमदारकिची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम विविध प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आज मतदार संघात 512 सिमेंटचे बंधारे उभारले अनेक तीर्थक्षेत्रांना व दर्जा मिळवून दिला मतदारसंघातील बहुतांश गावात गावांतर्गत सिमेंट रस्त्यांची शेकडो कामे झाली मोगरा येथील खंडोबाचे जागृत देवस्थान येथे येण्यासाठी रस्ता नव्हता पावसाळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत होती मागील वर्षी रस्ता अर्धा करण्यात आला आता यावर्षी मोगर लिंग फाटा ते मोगरा देवस्थान या पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होणार असून याही देवस्थानाला व दर्जा मिळवून देण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे, राज्य रस्ता क्रमांक 55 वरील जीवणापूर, पातरुड,लऊळ,देवडी या रस्त्याची दैना फिटणार असून माझ्या कार्यकाळात मी या रस्त्याचा प्रश्न सोडवू शकलो ही माझ्या करिता मोठी उपलब्धी आहे,मतदार संघात मागील सरकारच्या पंधरा वर्षात विकासाची कामे न झाल्याने मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष प्रचंड वाढला होता सामान्य लोकांना सत्तेचा उपयोग कसा होईल थेट गावपातळीवरील ग्रामस्थांना विकासाच्या यात्रेत सहभागी करून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगून आज खंडोबाच्या रस्त्याचे भूमीपुजण करताना अत्यानंद होत असून मोगऱ्यातून देव मल्हारीचे आशीर्वाद घेऊन जनतेसमोर जाणार त्यांनी सांगितले या प्रसंगी पत्रकार मंडळीसह राम शिंदे, सरपंच माणिकराव काजळे, हनुमान डोईजड,नगरसेवक विनायक रत्नपारखी, संचालक मथुरादास घाईतिडक,शहराध्यक्ष माणिक दळवे तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे,दत्ता महाजन,दत्ता गजमल, दत्ता भाऊ राठोड बाळासाहेब सातपुते,जयपाल भिसे, माऊली शिंदे,धनंजय काळे, ऍड विवेक शिंदे,राजू कुरेशी,रामेश्वर चव्हाण,यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती