Home » माझी वडवणी » मा.आ.केशवराव आंधळे गोपिनाथगडावर नतमस्तक

मा.आ.केशवराव आंधळे गोपिनाथगडावर नतमस्तक

मा.आ.केशवराव आंधळे गोपिनाथगडावर नतमस्तक

डोंगरचा राजा / ऑनलाईन

– अध्यक्षपदी निवड होऊन जिल्ह्यात परताच माजी आ.केशवराव आंधळे गोपीनाथगड़ावर नतमस्तक.

– महामंडळाच्या मध्यमातुन व ना.ताईसाहेबांच्यां मार्गदर्शनाखाली उसतोड़ कामगारांना बळ देणार.–केशवराव आंधळे

– बीड ते गोपीनाथगड चार चाकी वाहंनांच्या भव्य रँलीने जिल्हा हादरला

वड़वणी – उसतोड़ कामगार महामंड़ळ स्थापन करण्याचे स्व.गोपीनाथरावजी मुंड़े साहेबांचे स्वप्न होते.त्यांचे स्वप्न आज पालकमंत्री पंकजाताई मुंड़ेनी साकार केले. उसतोड़ कामगार महामंड़ळाच्या अध्यक्षपदी निवड़ झाल्यानंतर माजी.आ.केशवराव आंधळे आज बीड़ मधे आले. जिल्हात आल्यानंतर घरी न जाता त्यांनी थेट गोपीनाथगड़ गाठले व साहेबांच्या समाधी समोर नतमस्तक होत.पंकजातांईच्या मार्गदर्शनाखाली उसतोड़ कामगारांना सक्षम करण्याचा निश्चय केला.
उसतोड़ कामगार महामंड़ळ स्थापन झाले असुन त्या मंड़ळाच्या अध्यक्षपदी उसतोड़ कामगारांच्या व्यथेची जाणीव असलेले उसतोड़ कामगार नेते तथा माजी आ.केशवराव आंधळे यांची निवड़ झाली.निवड़ी नंतर जिल्हात उसतोड़ कमगार व मुकादमांनी मोठा जल्लोष साजरा केला. उसतोड़ कामगार महामंड़ळाच्या अध्यक्षपदी निवड़ झाल्या नंतर केशवराव आंधळे पहील्यांदाच बीड़ मधे आले.बीड़-परळी महार्गावर ठिक -ठिकाणी त्यांचा ताफा आड़वुन हितचितंकांनी ह्हदय सत्कार केला.जिल्हात आल्यानतर घरी न जाता ते थेट गोपीनाथगड़ावर गेले व साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक होत भविष्यात उसतोड़ कामगारांना बळ देण्याचा निश्चय केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की,उसतोड़ कामगारांची आर्थीक, सामाजिक परिस्थीती उंचावण्याकरता उसतोड़ महामंड़ळ स्थापन करण्याचे स्व.साहेबांचे स्वप्न होते परंतु आपली सत्ता नसल्याने इच्छा असतानांही साहेबांना काही करता आले नाही.नंतर आपली सत्ता आली पण नियतीने साहेबांना आपल्यातुन हिरावुन घेतले. स्व.मुंड़े साहेबांचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प ग्रामविकासमंत्री तथा आपल्या नेत्या पंकजातंईनी केला.व उसतोड़ कामगाग महामंड़ळ स्थापन करून दाखवले. व ह्या महामंड़ळावर माझी नेमणुक केली. तांईच्या आशीर्वादाने मला राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद मिळाले. राज्यमंत्र्याच्या दर्जा पेक्षा या महामंड़ळास स्व. गोपीनाथराव मुंड़े उसतोड़ कामगार महामंड़ळ असे नाव दिल्याने मला अभिमान वाटला. मझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविल.मी उतनार नाही मातनार नाही स्व.साहेबांनी शिकवलाला वसा सोड़णार नाही म्हणत भविष्यास पंकजातांईच्या माध्यमातुन उसतोड़ कामगारांना बळ देण्याचा विश्वास व्यक्त केले.

– वड़वणीत अभुतपुर्व स्वागत.
स्व.गोपीनाथराव मुंड़े उसतोड़ कामगार महामंड़ळाच्या अध्यक्षपदी निवड़ झाल्या नंतर गोपीनाथगड़ावर जाताना वड़वणीत त्यांचे अभुतपुर्व स्वगत करण्यात आले.दादांचे स्वागत करण्याकरिता उसतोड़ कामगारांनी हायवे जाम केला.तसेच गोपीनाथगड़ापर्यतं ठिक- ठिकाणी त्याचे फटाक्यांच्याआतीषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या 200 गाड्यांच्या ताफ्याने अनेकांचे लक्ष वेधले.

– भाजपा शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे यांचे दर्जेदार नियोजन…

दरम्यान लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार केशवराव दादा आंधळे हे अध्यक्षपदी निवडीनंतर प्रथमच आपल्या मायभूमी वडवणी शहरात आल्यानंतर आपल्या या लाडक्या राजकीय दैवतांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पार्टीचे वडवणी शहराध्यक्ष श्रीमंत तात्या मुंडे यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी दर्जेदार नियोजन करीत केशवदादा आंधळे यांचे भव्य दिव्य असे स्वागत यावेळी करण्यात आले. हजारोंची गर्दी, फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, गुलालाची मुक्तपणे उधळण व पेढे मिठाईचे वाटप करीत हा जंगी स्वागताचा सोहळा उत्कृष्टपणे पार पडला. हा स्वागत सोहळा पाहण्यासाठी अवघा वडवणी तालुका वडवणी शहरात एकत्रीत जमला होता. वडवणी शहरातील या जंगी स्वागत सोहळ्याच्या यशस्वीतेचे श्रेय भाजपाचे शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.