Home » माझी वडवणी » कँरम बुध्दीबळ,ब्रीज रम्मी स्पर्धेचे उद्घाटन

कँरम बुध्दीबळ,ब्रीज रम्मी स्पर्धेचे उद्घाटन

कँरम बुध्दीबळ,ब्रीज रम्मी स्पर्धेचे उद्घाटन

डोंगरचा राजा / ऑनलाईन

वडवणी येथे राजकला क्रिडा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने खुल्या कँरम,बुध्दीबळ ब्रिज रम्मी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना विविध बक्षिसे देण्यात आली.

वडवणी येथे राजकला क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने बीड-परळी हायवे रोड, आण्णाभाऊ साठे चौक, बाजार समिती परिसर येथे दिनांक 13/09/2019, शुक्रवार रोजी कँरम,बुध्दीबळ ब्रीज रम्मी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन सुग्रीव घोलप यांच्या हस्ते करण्यात येणार आले. आयोजकातर्फे या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रथम बक्षीस स्मृती चिन्ह ,शाल,श्रीफळ व नगदी 11,111 रुपये, व्दितीय बक्षीस 5555 रुपये तर तिसरे बक्षीस 3333 रुपये असे देण्यात येणार आले.यामध्ये बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानोबा शेळके प्रथम, धनंजय येसुगडे दुतीय, ओमकार गांधले तृतीय, त्याचप्रमाणे कॅरम स्पर्धेत दिलीप घोलप प्रथम,अरविंद गलांडे द्वितीय, अतीश मस्के तृतीय यांनी विजय पटकावला.या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना संस्थेचे सुग्रीव घोलप,अरविंद गलांडे यांच्यासह उपस्थित मान्यवर मंडळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.