Home » माझा बीड जिल्हा » लाचारीच्या राजकारणात धक्के कसले ? – अँड. देशमुख

लाचारीच्या राजकारणात धक्के कसले ? – अँड. देशमुख

लाचारीच्या राजकारणात धक्के कसले ? – अँड. देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– पक्षांतराच्या निष्ठाहीन राजकारणाला जनता चर्चेतही घेईना

बीड ( प्रतिनिधी ) राजकारणाच्या बाजारीकरणामुळे निष्ठा नावाची गोष्ट संपली. पूर्वी निष्ठा असल्याचे दिसत होते. आता पक्षातून काढणारे आणि दुसऱ्या पक्षात पक्षांतर करणारे सारखेच झाल्याने याबाबत लोक चर्चा करायलाही तयार नाहीत. त्यातल्या त्यात धक्के नावाच्या बातम्या तर कोणालाही धक्के देत नाहीत. लोकांचे एकच म्हणणे आहे की, लाचारीच्या राजकारणात धक्के कसले ? त्यामुळे जनतेने दिशाहीन राजकारणावर चर्चा करणे जवळपास बंद केले असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.

पक्षांतरच्या वावड्या सध्या मोठ्या प्रमाणात उठत आहेत. मोठ्या उलथापालथी होत आहेत. एक काळ असा होता की, जिल्ह्यातील भले भले सर्व एका पक्षात होते. आज तेच सर्वत्र दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे चढ उतार नेतेच नाही तर जनताही जाणून आहे. त्यामुळे जनता अशा बाबींना मोजायला तयार नाही.

जनतेला राजकारणातील निष्ठा हा विषय आता नव्याने शिकवा लागेल. राजकारणातल्या निष्ठा या शब्दाचा अर्थ आता पूर्ण बदलला आहे. निष्ठा शब्द सध्याचे राजकारण पाहून स्तब्ध होईल की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही काळात जातीवाद हा शब्द घेऊन काही लोक राजकारण करत होते. मात्र आता अनेक लोक समाजवाद आणि पुरोगामीत्व सोडून देत आहेत. पुरोगामी महाराष्ट्र आता कोणत्या दिशेने जात आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यात चाललेल्या घडामोडी लोक लक्षात घ्यायलाही तयार नाहीत.

सत्तेच्या चाव्या सांभाळणे, एवढ्या एकाच मुद्याला घेऊन राजकारणात खळबळ होत असली तरी जातीवाद कुठपर्यंत साथ देतो, हे आता पहायला मिळणार आहे. लोकांना त्यांचा विचार करणारा राजकारणी हवा आहे. पण लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करणारांची सध्या वाणवा दिसत आहे.

काही लोकांचे म्हणणे तर असे आहे की, ज्यांनी दुसरे पक्ष अथवा संघटना संपवण्यासाठी हयात घातली, अशा लोकांना काय म्हणून पाठबळ द्यायचे. तर काही लोक म्हणतात की, हे लोक पैशाच्या जोरावर मतदान विकत घेतली. काहीही असले तरी पैसा चालतो का निष्ठा ? अंर्तगत राजकारण लाथाळते, की त्यात उपऱ्या लोकांना संधी मिळते, हे जनता ठरवेल, असे काही लोक सांगतात. त्यामुळे येणारी निवडणूक कशी असेल, कोण कोणाला पसंत करील, कसा असेल मतदारांचा रोख, संधीसाधू लोकांचं काय होणार ? या सर्व बाबी पहायला मिळणार आहेत.

जनतेचा विचार न करता स्वतः निर्णय घेणे आणि जनतेवर लादणे, ही बाब आता सोपी राहिलेली नाही. जनते बरोबर चर्चा केल्यानंतर या बाबी प्रामुख्याने समोर येतात. समाज मन आता चंचल झालेले असून विचार पूर्वक मत टाकून जनता लाचारीच्या राजकारणाला कसे धक्के देत, हे यंदा पहायला मिळेल, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.