Home » माझी वडवणी » कँरम बुध्दीबळ,ब्रीज रम्मी स्पर्धेचे आयोजन.

कँरम बुध्दीबळ,ब्रीज रम्मी स्पर्धेचे आयोजन.

कँरम बुध्दीबळ,ब्रीज रम्मी स्पर्धेचे आयोजन.

डोंगरचा राजा / आँनलाईन

-स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – गलांडे

वडवणी प्रतिनिधी – वडवणी येथे राजकला क्रिडा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या वतीने खुल्या कँरम,बुध्दीबळ ब्रिज रम्मी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना विविध बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत तरी या स्पर्धेत तालुक्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन क्रिडा मंडळाचे अध्यक्ष अरविंद गलांडे यांनी केले आहे.
वडवणी येथे राजकला क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने बीड-परळी हायवे रोड, आण्णाभाऊ साठे चौक, बाजार समिती परिसर येथे दिनांक 13/09/2019, शुक्रवार रोजी कँरम,बुध्दीबळ ब्रीज रम्मी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उदघाटन सुग्रीव घोलप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आयोजका तर्फे या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रथम बक्षीस स्मृती चिन्ह ,शाल,श्रीफळ व नगदी 11,111 रुपये, व्दितीय बक्षीस 5555 रुपये तर तिसरे बक्षीस 3333 रुपये असे देण्यात येणार आहेत तरी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी संस्थेचे अध्यक्ष अरविंद गलांडे मोबाईल नंबर 9146468450 यांच्याशी संपर्क करून नावनोंदणी करावी असे आवाहन स्पर्धेचे आयोजक अरविंद गलांडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.