Home » माझा बीड जिल्हा » ना.पंकजाताई मुंडे यांचा पुढाकार..

ना.पंकजाताई मुंडे यांचा पुढाकार..

ना.पंकजाताई मुंडे यांचा पुढाकार..

डोंगरचा राजा / आँनलाईन

– परळीतील बचतगटांच्या महिला होणार उद्योजक!

▪ ना. पंकजाताई मुंडे यांचा पुढाकार; रविवारी ५ कोटी ६० लाखांच्या ८०० गायींचे वाटप

परळी : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारामुळे परळी मतदारसंघातील बचतगटांच्या महिला आता उद्योजक बनणार आहेत, याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पशूसंवर्धन विभागाच्या वतीने येत्या रविवारी त्यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात ८०० संकरित गायींचे वाटप होणार आहे, सुमारे ५ कोटी ६० लाख रूपये किंमतीच्या या गायी आहेत.

येत्या रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वा. नटराज रंगमंदिराच्या आवारात पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बचतगटातील महिलांना ८०० संकरित गायी वितरित करण्यात येणार आहेत. यावेळी पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डाॅ. मार्कंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परळी मतदारसंघातील बचतगटांच्या महिला स्वावलंबी व्हाव्यात, त्यांना रोजगार मिळावा, यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी बचतगटांतील महिलांना गायी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. पहिल्या टप्प्यात परळी तालुक्यातील ५४० आणि अंबाजोगाई तालुक्यातील २६० अशा ८०० महिलांना ७० हजार रुपये किंमत असलेली प्रत्येकी एक गाय वाटप करण्यात येणार असून सरासरी २० लिटर दूध या गायीपासून मिळणार आहे. ज्या महिलांना गायी मिळणार आहेत, त्या सर्व उद्योजक महिलांची दूध उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येऊन त्याद्वारे व्यवसाय वाढीसाठी चालना दिली जाणार आहे. लाभार्थी महिलांना गो-पालनाचे विशेष प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. रविवारी वाटप होणा-या गायी हया पुणे येथील मिल्ट्री डेअरी फार्म येथून परळीत दाखल झाल्या आहेत.

▪ योजना सुरूच राहणार :

येत्या रविवारी आठशे गायींचे वाटप होणार असले तरी बचतगटांतील महिलांसाठी ही योजना पुढेही टप्प्या- टप्प्याने सुरूच राहणार आहे. त्यासाठी संबंधित बचतगटांच्या महिलांनी गांव पातळीवर काम करणा-या सीआरपी कडे आपल्या नावांची नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यानंतर संबंधित महिलांना गाय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने बचतगटांच्या महिला या माध्यमातून आता उद्योजक बनणार असून या कार्यक्रमास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पशूसंवर्धन विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.