Home » राजकारण » दर्जा मिळून देण्याचा ना.पंकजा मुंडेंचा निर्धार..

दर्जा मिळून देण्याचा ना.पंकजा मुंडेंचा निर्धार..

दर्जा मिळून देण्याचा ना.पंकजा मुंडेंचा निर्धार..

डोंगरचा राजा / आँनलाईन

— अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय दर्जा मिळून देण्याचा पंकजा मुंडेंचा निर्धार..

— अंबाजोगाईत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या‍ वतीने पालकमंत्री पंकजा मुंडेंचा भव्य सत्कार; आनंदी मेळावा उत्साहात

अंबाजोगाई — गेल्या २० वर्षात जेवढी वाढ अंगणवाडी कर्मचार्‍यांना झाली नाही. त्यापेक्षा जास्त वाढ मी अंगणवाडीकर्मचार्‍यांना दिली आहे. कर्मचार्‍यांना पेन्शन मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांचा सर्वात महत्वाचा प्रश्‍न म्हणजे त्यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळून देणे हे माझे काम आहे आणि येणार्‍या काळात ते पूर्ण पूर्णच करणार असल्याचे आश्‍वास महिला बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दिले. त्या. अंबाजोगाई येथे महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सत्कार व आनंदी मेळाव्या निमित्त बोलत होत्या.

महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या लक्ष लावून सहानुभूतीपूर्वक सोडून अंगणवाडी कर्मचार्यांना न्याय दिला त्याबद्दल बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या भव्य सत्कार व ऋण निर्देश सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघ शाखा बीडच्यावतीने शनिवार दि.31 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई येथील साधना मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ना. पंकजाताई बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. आर.टी. देशमुख, केजच्या आ.संगिताताई ठोंबरे, रंजना काळम पाटील, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राज्य महिला अयोगाच्या सदस्या गयाताई कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना ना. पंकजाताई म्हणाल्या की, आंगणवाडी कर्मचारी हे तुटपुज्या मानधनावर काम करत असल्यामुळे गेल्या 20 वर्षात जेवढी वाढ या कर्मचार्‍यांना झाली नाही. त्यापेक्षा जास्त वाढ मी अवघ्या 5 वर्षात दिली आहे. येणार्‍या काळात मला अंगणवाडी कर्मचार्‍यांचे सर्वच प्रश्‍न सोडवायचे आहे. एक महिला म्हणून मी त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असते. कर्मचार्‍यांना जी मानधनवाढ झाली आहे. त्याचा जी. आर. काढण्यात आलेला आहे. त्याची तत्काळ अमलबजावणी करण्यात येईल. शिवाय सर्व माधनवाढ कर्मचार्‍यांच्या खात्यावर तत्काळ टाकण्यात येईल. मला तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवायच्या आहेत. आपले प्रश्‍न हक्काने मला सांगा असे अवाहनी यावेळी ना. मुंडे यांनी केले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना न्याय देण्याचे काम सातत्याने केले आहे. अंगणवाडी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी भांडत होते. महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे भरघोस वाढ झाली आहे. दिवाळी भेटीतही वाढ झाली असून त्यांच्यामुळे इतर प्रश्न सुटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस आनंदीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा ऋण निर्देशन सोहळा व जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात आंबाजोगाई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कमल बांगर, प्रदेश संघटक दत्ता देशमुख, जिल्हासंघटक सचिन आंधळे, निर्मला कराड, रजिया दारूवाले, विजया बुगदे, लता चेपटे, शर्मिला ठोंबरे, अग्नी खळगे, शामल जोगदंड, वच्छला नाईकवाडे, कौशल्या कटारे, उषा शेळके, लता बोबडे, अमतुल्य मोहम्मदी सय्यद, साजेदा बेगम शेख, शिला उजगरे, शामल सोळंके, मंगल थोरात, संजिवनी डोंगर, रजनी मोहड, रोहिणी लोमटे, छाया कुलकर्णी यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

#कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी; आपुलकीने पालकमंत्री भारावल्या :

पालकमंत्री पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या लक्ष लावून सहानुभूतीपूर्वक सोडून अंगणवाडी कर्मचार्यांना न्याय दिला त्याबद्दल त्यांच्या भव्य सत्कार व ऋण निर्देश सोहळ्यासाठी प्रचंड संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित राहिल्या होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने पंकजा मुंडे भारावल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.