Home » महाराष्ट्र माझा » मुख्यमंत्र्यांना निवेदनं द्या.. प्रश्‍नही विचारा..

मुख्यमंत्र्यांना निवेदनं द्या.. प्रश्‍नही विचारा..

मुख्यमंत्र्यांना निवेदनं द्या.. प्रश्‍नही विचारा..

डोंगरचा राजा / आँनलाईन

– मराठी पत्रकार परिषदेचं आवाहन

-पत्रकार पेन्शनचा घोळ,कायद्याची टोलवाटोलवी

मुंबई – महाराष्ट्रातील पत्रकारांचे अनेक प्रश्‍न सरकार दरबारी प्रलंबित आहेत.सरकार हे प्रश्‍न सोडवत नसल्याबद्दल पत्रकारांमध्ये मोठी नाराजी आहे.विशेषतः राज्यातील केवळ 23 ज्येष्ठ पत्रकारांनाच निवृत्ती वेतनाचा लाभ देऊन सरकारनं बहुतःश गरजू पत्रकारांच्या तोंडाला पाने पुसल्याबद्दल पत्रकारांमध्ये संताप आहे.अधिकार्‍यांनी हेतूतः काही अर्ज बाद केल्याचीही चर्चा आहे.पत्रकार संरक्षण कायदा असेल,पत्रकार आरोग्य योजना असेल,छोटया वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असेल,किंवा मजिठियाच्या अंमलबजावणीचा विषय असेल हे सारे प्रश्‍न अधांतरीच आहेच.त्यामुळं मिडियाच्या सर्वच घटकांमध्ये मोठी खदखद आहे.वेगवेगळ्या व्यासपीठावरून ती व्यक्त ही होत असते.मराठी पत्रकार परिषदेच्या नुकत्याच नांदेड येथे झालेल्या अधिवेशनात यासर्व प्रश्‍नावर सांगोपांग चर्चा होऊन काही ठरावही संमत झाले.मुख्यमंत्र्यांना या ठरावाच्या प्रती देखील रवाना करण्यात आलेल्या आहेत.मात्र सरकार उदासिन दिसते आहे.अशा स्थितीत हे सारे प्रश्‍न थेट मुखमंत्र्यांना भेटून त्यांच्या कानावर घालण्याची संधी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं राज्यातील पत्रकारांना आलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेसाठी राज्याच्या दौरयावर आहेत.प्रत्येक ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो.जाहीर सभा होते.तसेच मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील होते.मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत जनसामांन्यांशी निगडीत अनेक प्रश्‍नांची उत्तरं आपण मुख्यमंत्र्यांकडून घेत असतो.त्याच पध्दतीनं आपल्या प्रश्‍नांचा उहापोह देखील या पत्रकार परिषदेत झाला पाहिजे.पत्रकारांच्या न सुटलेल्या प्रश्‍नांबाबत एक-दोन प्रश्‍न तरी प्रत्येक पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना विचारलेच गेले पाहिजेत.तसेच मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनं देऊन आपल्या प्रश्‍नांकडं त्यांचं लक्ष वेधलं जावं असे आवाहन करण्यात येत आहे.बीडयेथील पत्रकारांनी परवा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिलं,परभणीत आज पत्रकार परिषदेत पेन्शनचा प्रश्‍न उपस्थित केला गेला उद्या सकाळी हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद आहे तेथेही पत्रकारांच्या प्रश्‍नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधावे असे आवाहन करण्यात येत आहे.मुख्यमंत्री जेेथे जातील तेथे आपले प्रश्‍न उपस्थित केले गेले तर त्यानाही विषयाचे गांभीर्य लक्षात येईल आणि अधिकारी जी लपवालपवी करीत आहेत ते ही त्यांच्या कानावर जाईल.मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा शाखांनी यावर योग्य ती कारवाई करावी

*एस.एम.देशमुख*

मुख्य विश्‍वस्त

मराठी पत्रकार परिषद,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.