Home » माझा बीड जिल्हा » पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रक्तदान..

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रक्तदान..

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रक्तदान..

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी – तालुक्यातील देवडी व पंचक्रोशीतील तरूणानी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आले तषेच पूरग्रस्तांना आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यात आली आहे,परुंतु पहिल्यांदाच पूरग्रस्तांसाठी रक्तदानाची मदत केली आहे. वडवणी सारख्या भागात कोरडा दुष्काळ असताना सुद्धा भरपूर प्रमाणात मदत दिली आहे व आणखीही करण्याचा प्रयत्न करत आहेत. देवडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी रक्तदानाची मदत करत आहेत कारण
पूरग्रस्तांसाठी भागात अनेक जनावरे मेली लोकांच्या घरात पाणी गेल त्यामुळे तेथे रोगराई वाढणार आहे (ताप,मलेरिया टायफाईट,डेंगु,असे अनेक आजार उद्वभवतील)त्यामुळे तेथे रक्ताची गरज लागणार आहे.हि गरज ओळखून
या रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,तर या शिबिरात तरुणाची उस्फूर्त पणे सहभाग नोंदवला व 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले .या शिबीराचे उद्घाटन माजी सैनिक दत्तात्रय मोहिते यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले व हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी , डॉ.भागवत झाटे,ओम पुरी, अविनाश झाटे,प्रदिप गिलबीले,गितेश आगे, गोकुळ उबाळे,अविनाश फरताडे,हारीश बादाडे,राजेभाऊ बादाडे,रमेश शेंडगे,राहुल सुरवसे शाहरुख पठान,वसुदेव बादाडे,वसुदेव घाटुळ,गणेश अंबुरे ,सुरज घुगे इत्यादी पंचक्रोशीतील तरूणानी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.