Home » माझा बीड जिल्हा » जि.प.सदस्य संजय नवले यांना मातृशोक

जि.प.सदस्य संजय नवले यांना मातृशोक

जि.प.सदस्य संजय नवले यांना मातृशोक

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा – तालुक्यातील पारनेर येथील अनुसया शंकर नवले पाटील वय 86 यांचे 23 ऑगष्ट रोजी सायंकाळी 11 च्या दरम्यान हॉस्पिटल मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले

बीड जिल्हा परिषद सदस्य संजय नवले व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद नवले यांच्या मातोश्री अनुसया शंकरराव नवले पाटील यांचे वृद्धापकाळाने जामखेड येथे हॉस्पिटल मध्ये दि 23 रोजी सायंकाळी 11 च्या दरम्यान निधन झाले अत्यंत प्रेमाळू व मनमिळावू स्वभावाच्या असणाऱ्या कधी ही भेट झाली तरी प्रत्येकाची अस्थेवाईक चौकशी करत सर्वसामान्य कुटुंबाला आधार देणाऱ्या होत्या प्रत्येकाची आपुलकी असल्याने लहान थोरापासून सर्वच त्यांना आदराने बाई म्हणून बोलवत होते त्या आज न राहिल्याने परिसरात सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शनिवारी जामखेड येथील अमरधाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला वेळी माजी मंत्री आमदार सुरेश धस, माजी जि प अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, माजी सभापती महेंद्र गर्जे, शिवनाथ पवार, राजेंद्र कोठारी, माऊली जरांगे,प्रकाश कवठेकर, , महेंद्र गर्जे, पिनू जायभाय, सरपंच संजय खोटे, नगरसेवक विजय जोशी , बालाजी जाधव, नगरसेविका उज्वला जंगले, भरत शिंदे, बाळासाहेब शिंदे, मधुकर राळेभात सभापती उद्धव दरेकर, पांडुरंग पवार इत्यादी जण उपस्थित होते त्यांच्या पश्चात दोन मुलं, मुली सुना नातवंड, असा मोठा परिवार आहे नवले कुटुंबियांच्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे

Leave a Reply

Your email address will not be published.