राज्यभर पत्रकारांचे मोर्चे – एस.एम.देशमुख
— प्रलंबित मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर रोजी राज्यभर पत्रकारांचे मोर्चे …..
नांदेड — मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन यापुढे फक्त मान्यवर पत्रकारांच्या हस्तेच होईल अशी घोषणा एस. एम देशमुख यांनी आज नांदेडमध्ये केली..
मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन आज ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी देशमुख बोलत होते.
महाराष्ट्र सरकार पत्रकारांच्या प्रश्नाकडे करीत असलेले दुलॅक्ष संतापजनक आहे.. त्याच्या निषेधार्थ २ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हयात पत्रकारांचे मोचा॓ काढण्यात येणार असल्याची घोषणा देखील एस.एम.देशमुख यांनी केली..