Home » माझा बीड जिल्हा » एस.एम.देशमुख आणि कुटुंबाचा उपक्रम..

एस.एम.देशमुख आणि कुटुंबाचा उपक्रम..

एस.एम.देशमुख आणि कुटुंबाचा उपक्रम..

डोंगरचा राजा / आँनलाईन

*एस. एम.देशमुख आणि कुटुंबाने उपलब्ध करून दिली गावच्या जिल्हा परिषद शाळेत इ-लनिॅंगची सुविधा*..

देवडी : देवडी येथील देशमुख परिवाराच्यावतीने ऊद्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेला एक लाख रूपयांचे टीव्ही, प्रोजेक्टर, इन्व्हर्टर आदि साहित्य भेट देण्यात येणार.. गावचे माजी सरपंच माणिकराव देशमुख आणि सौ. लिलाबाई माणिकराव देशमुख यांच्या हस्ते सकाळी ७. ३० वाजता या हे साहित्य शाळेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस. एम देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. गावातील सामांन्य वर्गातील मुलांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा आणि त्यांनाही इलनिॅंगचया माध्यमातून आधुनिक शिक्षण घेता यावे हा हे साहित्य देण्यामागचा उद्देश असल्याचे पुण्याचे सहधम॓दाय आयुकत दिलीपराव देशमुख यांनी स्पष्ट केले.. एस.एम.देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे..
*सायकलचे वितरण होणार*
रेणुका माता विद्यालयात बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणारया गरीब विद्यार्थ्यांना उद्याच सौ. लिलाबाई माणिकराव देशमुख आणि श्री. माणिकराव देशमुख यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात येणार आहे.. एक दोन किलो मिटरवरून शाळेत येणारया मुलामुलींचा वेळ वाचावा आणि त्यांना तेवढा वेळ अभ्यासासाठी मिळावा यासाठी या सायकली दिल्या जात आहेत.. यापुर्वी देखील या शाळेतील दहा मुलांना सायकली दिल्या गेल्या होत्या..काल चिंचवण येथील दोन शाळांना २० सायकली एस.एम.देशमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.. यावेळी सोमनाथजी बडे आणि तसेच सरपंच राम म्हात्रे पत्रकार अनिल वाघमारे उपस्थित होते..
खडकी देवळा येथे आज झालेल्या काय॓क़मास २० गरीब आणि होतकरू मुलांना सायकलचे वाटप करण्यात आले.. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेशराव आडसकर उपस्थित होते.. रमेशराव आडसकर यांनी यावेळी एस.एम.देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्या दातृत्वाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.. देशमुख कुटुंबाने देवडी गावचा कायापालट करणारा आडी बंधारा प्रकल्प राबवून गावचा दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करण्याचे मोठे काम केल्याचे सांगितले.. यावेळी एस.एम.देशमुख यांनी ज्या गावात आमचे शिक्षण झाले त्या गावासाठी फूल नाही फुलाची पाकळी का होईना देता आली याचा मोठा आनंद असल्याचे मत व्यक्त केले.. पत्रकार अनिल वाघमारे यांनी प्रास्ताविक केले..

Leave a Reply

Your email address will not be published.