Home » महाराष्ट्र माझा » सांगली,कोल्हापुर मुळे बीडचा कार्यक्रम रद्द – ना.आठवले

सांगली,कोल्हापुर मुळे बीडचा कार्यक्रम रद्द – ना.आठवले

सांगली,कोल्हापुर मुळे बीडचा कार्यक्रम रद्द – ना.आठवले

डोंगरचा राजा / आँनलाईन

— सांगली- कोल्हापुरातील महापुरामुळे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे बीड परभणी आणि मुंबईतील सत्काराचे सर्व कार्यक्रम रद्द

*पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले उद्या शनिवारी सांगली कोल्हापूर दौऱ्यावर*

मुंबई दि. 9 – सांगली कोल्हापूर परिसरात आलेल्या महापुरामुळे अनेक जणांचे जीव गेले. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उद्या शनिवारी दि. 10 ऑगस्ट रोजी सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यांचा उद्याचा नियोजित परभणी आणि बीड जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आला असून बीड आणि मुंबईतील सत्काराचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केली.

उद्या दि.10 ऑगस्ट रोजी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे आधी ठरविल्याप्रमाणे परभणी आणि बीडचा दौरा करणार होते. बीड येथे त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र सांगली कोल्हापूर येथे महापुरामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे बीड चा सत्कार आणि येत्या दि. 14 ऑगस्ट रोजी मुंबईत नियोजित करण्यात आलेला सत्कार रद्द करण्यात आला असल्याचे अधिकृत घोषणा ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. उद्या शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी ना रामदास आठवले सांगली आणि कोल्हापूर चा दौरा करणार असून रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.