Home » माझा बीड जिल्हा » पूरग्रस्तांना पाटोदेकरांचा मदतीचा हात.

पूरग्रस्तांना पाटोदेकरांचा मदतीचा हात.

पूरग्रस्तांना पाटोदेकरांचा मदतीचा हात.

अमोल जोशी/डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी बीड जिल्ह्यातून विविध प्रकारे मदतीचा हात दिला जात आहे. पाटोदेकरांनीही या मदत अभियानात सहभाग घेतला आहे ,शहरातील काही भागात शुक्रवारी मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते तसेच आज दि 10 ऑगष्ट पाटोदा शहरात पुरग्रस्तासाठी मदतफेरीचे आयोजन केले आहे .
या बाबत अधिक वृत्त असे की गेल्या चार दिवसांपासून सांगली ,कोल्हापूर भागात अतिवृष्टीने कहर केला असून अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढले आहेत तेथील लोक या भयान पुरपरिस्थितीत पूर्ण घरे, दुकाने पाण्यात गेल्याने बेघर झाले आहेत अजूनही पूर ओसरत नसल्याने लोकाचे प्रचंड हाल होत असून बेघर झाल्याने खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अश्या या अडचणीत आपल्या बांधवाना मदत म्हणून बीड ज़िल्यातून सर्वत्र मदत फेरी सुरु असून याचाच एक भाग म्हणून पाटोदकरांनी यात सहभागी होत आपलाही खारीचा वाटा तयार केला असून शहरवासीयांनी या फेरीला चांगला प्रतिसाद दिला

Leave a Reply

Your email address will not be published.