Home » ब्रेकिंग न्यूज » १४ जणांचा मृत्यू,मुख्यमंत्री कोल्हापूरात..

१४ जणांचा मृत्यू,मुख्यमंत्री कोल्हापूरात..

१४ जणांचा मृत्यू,मुख्यमंत्री कोल्हापूरात..

डोंगरचा राजा / आँनलाईन

बचावकार्य करणारी बोट बुडून १४ जणांचा मृत्यू, एनडीआरफएफ,लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके, नौदल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात दाखल

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या चारही जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके आणि नौदल दाखल झालं आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील कोल्हापूरात दाखल झाले असून त्यांनी पुरपरस्थीतीची पाहणी केली आहे.

कोल्हापूर —
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या चारही जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके आणि नौदल दाखल झालं आहे.

सांगली —
बचावकार्य करणारी बोट बुडून १४ लोकांचा मृत्यू
नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला सुरक्षित ठिकाणी हलवले…

सांगली —
पलूस येथे बचावकार्य करणारी बोट उलटली; ८-१० जण बुडाल्याची भीती कोल्हापूरमध्ये तटरक्षक दलाकडून मदतकार्य..

सांगली —
आयर्विन पुलाजवळ पाणापातळी ५७ फुटांवर
कोल्हापूर – नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेची रेस्क्यू टीम कार्यरत

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात दाखल केली पुरपरस्थीती पाहणी*

एनडीआरफकडून कोल्हापुरात बचावकार्य…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला पूरपरिस्थितीचा आढावा
कोल्हापुरातील आज सकाळची दृश्य…
पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळं मुंबईचा दूधपुरवठा आटला!

कोल्हापूर —
मध्यरात्रीच्या उसंतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात

कोल्हापूर —
कसबा बावड्यातील भगवा चौक ते छावा चौक या मार्गावरील पाणी पूर्ण ओसरले; वाहतूक पूर्ववत

कोल्हापूर —
नागला पार्क परिसरातील विन्स रुग्णालयात पाणी; रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले.

सांगली —
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिरले पाणी

कोल्हापूर —
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात खासदार संभाजीराजेंनी केली पूर पाहणी…पश्चिम महाराष्ट्रात १६ पूरबळी, अतिवृष्टीचा इशारा

सांगली —
पूरग्रस्त भागात वीज सेवा पूर्णपणे ठप्प

कोल्हापूर —
राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बुधवारी रात्री पुन्हा उघडले, पुरस्थिती अतिगंभीर होण्याची भीती

पुणे —
मार्केट यार्डात फळभाज्यांचीआवक ३० ते ३५ टक्क्यांने घटली , कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी जाहीर
कोल्हापूर – प्रयाग-चिखलीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू

कोल्हापूर —
नौदलाची २२ जणांची टीमही बोटीसह बचाव कार्यात सक्रीय शहराच्या अनेक भागांत पाणी दहा फुटांपर्यंत पाणी.

– कोल्हापूर, सांगली, सातारा शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती अत्यंत बिकट.

— पूर परिस्थितीमुळे पंपावरील पेट्रोल, डिझेल संपले…

कोल्हापूर —
गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बेंगळुरू हायवेवरील वाहतूक बंद पडल्याने बुधवारी शहरातील पंपांवरील पेट्रोल – डिझेल संपले. बहुतांश पंप बंद झाल्याने आणि महापूर वाढत असल्याचा धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू टीमसाठी उर्वरीत पेट्रोल पंप ताब्यात घेतले. टंचाईमुळे पेट्रोल शोधताना वाहनधारकांची वणवण सुरू राहिली.

सांगली जिल्ह्यातील भिलवडी, हजारवाडी येथील प्रकल्पातून कोल्हापुरातील पेट्रोल आणि डिझेल पंपांना टँकरद्वारे इंधन पुरवठा होतो. कोल्हापूरला येण्याचे काही मार्ग बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार नसल्याच्या भीतीने मंगळवारी पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे काही पंपांवर दुपारी पेट्रोल संपले. राजारामपुरी, कावळा नाका, उमा टॉकीज, उद्यमनगर, फुलेवाडी, देवकर पाणंद, पुईखडी रोडवरील पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी रांग लागल्याने पंपावरील व्यवस्थापन कोलमडले. काही ग्राहकांनी रांगेतून पुढे जाऊन वाहनांत पेट्रोल टाकल्याने वाद झाले.
बुधवारी सकाळ मात्र पेट्रोल, डिझेलचा खडखडाट करूनच उजाडली. कसबा बावड्यातील दोन पंप आणि पोलिस मैदानासमोर असलेल्या पंपावरही पेट्रोल नव्हते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दाभोळकर कॉर्नरवरील एक, राजीव गांधी पुतळा परिसरातील दोन, कावळा नाक्यावरील दोन पंपातही पेट्रोल नव्हते. त्यामुळे नागरिकांनी राजारामपुरी, बागल चौकापर्यंत धाव घेतली. पार्वती टॉकीज परिसरातील तीन पंपही बंद आहेत.
पेट्रोल संपत आल्याचे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेल असोसिएशनला सर्व पंपांतील उर्वरीत इंधनाचा साठा रिझर्व्ह स्टॉक ठेवा अशा सूचना दिल्या. एनडीआरएफसह बचाव पथकांना या पेट्रोलची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकासांठी इंधन विक्री बंद करावी असे आदेश देण्यात आल्याने पेट्रोल विक्री बंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.