Home » माझी वडवणी » माजलगांव धरणात पाणी सोडणार – ना.क्षीरसागर

माजलगांव धरणात पाणी सोडणार – ना.क्षीरसागर

माजलगांव धरणात पाणी सोडणार – ना.क्षीरसागर

डोंगरचा राजा / आँनलाईन

– जायकवाडीतून माजलगाव धरणात अडीच टी एम सी पाणी सोडनार*

– ना क्षीरसागर यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

बीड – जायकवाडी धरणाची पाणी पातळी 67%पर्यंत पोहचली आहे त्यामुळे हे पाणी पैठण उजव्या कालव्यातुन माजलगाव धरणात तात्काळ सोडल्यास बीड सह 11 गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी आग्रही मागणी ना जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार येत्या दोन दिवसात अडीच टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन क्षीरसागर बंधूंच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे

बीड शहराला बिंदुसरा आणि माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो मात्र दोन्ही धरणाची पाणी पातळी मृत साठ्यात गेली त्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आता नाशिक व परिसरात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी 67% ने वाढली आहे,पैठणच्या उजव्या कालव्यातून 3 टी एम सी पाणी माजलगाव धरणात सोडले तर बीड सह 11 खेड्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो हे पाणी तात्काळ सोडावे अशी आग्रही मागणी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री ना जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार जायकवाडीतून अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सम्बधित विभागाचे अधिकारी कोहिरकर यांना दिले आहेत,यामुळे आता बीडसह ग्रामीण भागातील 11 गावाचा पाणी सुटण्यास मदत होईल,दोन दिवसात पैठणच्या उजव्या कालव्यातून हे पाणी माजलगाव धरणात सोडण्याची प्रक्रिया होणार असल्याचे जायकवाडी प्रकल्प चे व्यवस्थापकीय संचालक कोहिरकर यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.