Home » महाराष्ट्र माझा » मराठी पत्रकार परिषदेवर पाबळे,जोशी यांची बिनविरोध

मराठी पत्रकार परिषदेवर पाबळे,जोशी यांची बिनविरोध

मराठी पत्रकार परिषदेवर पाबळे,जोशी यांची बिनविरोध

डोंगरचा राजा / आँनलाईन

*मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी शरद पाबळे व सरचिटणीसपदी संजीव जोशी यांची बिनविरोध निवड!*

मुंबई — मराठी पत्रकार परिषदेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया 15जुलै 2019 पासून सुरू करण्यात आली.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी श्री.शरद पाबळे व सरचिटणीस या पदासाठी श्री. संजीव जोशी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2019-2021 यासाठी पुणे येथील सकाळ समुहाचे प्रतिनिधी *श्री.शरद पाबळे* यांची *कार्याध्यक्षपदी* व पालघर येथील दैनिक राजतंत्रचे संपादक *श्री.संजीव जोशी* यांची *सरचिटणीसपदी* बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात येत आहे.

आज मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात नवनियुक्त श्री.शरद पाबळे व श्री.संजीव जोशी यांचा सत्कार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख व मा किरण नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बापूसाहेब गोरे(पुणे) व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री अच्युत पाटील(पालघर)यांनी काम पाहिले तसेच श्री शरद पाबळे व श्री संजीव जोशी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.