Home » महाराष्ट्र माझा » मराठी पत्रकार परिषद,राष्ट्रीय अधिवेशन नांदेड

मराठी पत्रकार परिषद,राष्ट्रीय अधिवेशन नांदेड

मराठी पत्रकार परिषद,राष्ट्रीय अधिवेशन नांदेड

डोंगरचा राजा / आँनलाईन

*परिसंवाद* 1

माध्यम स्वातंत्र्य केवळ तोंडी लावण्यापुरतंच उरलंय का ?

वृत्तपत्र स्वातंत्र्य आपल्या घटनेनं मान्य केलं आहे.मात्र या स्वातंत्र्याची पदोपदी गळचेपी सुरू आहे.सरकारकडू ती जशी सुरू आहे तव्दतच ती अन्य हितसंबंधियांकडून देखील सुरू आहे.सरकारला आपला उदोउदो करणारीच माध्यमं हवी असतात,एखादं माध्यम समुह जेव्हा सरकारची ही अपेक्षा पूर्ण करीत नाही तेव्हा त्याच्या जाहिराती बंद करण्यापासून त्या माध्यम समुहांवर धाडी घालण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न केले जातात. व्यवस्थापनाना धमकावत ना आवडता संपादक काही क्षणात बदलला जातो,व्यक्तीगत पातळीवर पत्रकारांवरील वाढते हल्ले,पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करणे असे प्रकार सर्रास आणि सर्वत्र सुरू आहे.त्यामुळं सारे माध्यमकर्मी आज एका अनामिक दबावाखाली काम करताना दिसतात.अशा स्थितीत ही माध्यमं जनतेच्या अपेक्षांना खरी उतरत नसल्याने जनतेचाही रोष त्यांच्यावर आहेच.त्यामुळं असा प्रश्‍न उपस्थित होतोय की, विविध दबावांनी व्यापलेलं माध्यम स्वातंत्र्य आता केवळ तोंडी लावण्यापुरतेच उरले आहे का ?

आजच्या या ज्वलंत प्रश्‍नावरचा परिसंवाद

मराठी पत्रकार परिषदेच्या नांदेड अधिवेशनात होणार आहे.

या परिसंवादात खालील मान्यवर आपले विचार मांडतील.

केशव उपाध्ये ( भाजप प्रवक्ते,मुंबई )

सचिन सावंत ( कॉग्रेस प्रवक्ते,मुंबई )

असिम सरोदे ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा विधिज्ञ ,पुणे )

भालचंद्र कांगो ( कम्युनिस्ट नेते,औरंगाबाद )

मंगल खिवंसरा ( सामाजिक कार्यकर्त्या,औरंंगाबाद )

जतीन देसाई ( ज्येष्ठ पत्रकार,मुंबई )

नरेंद्र वाबळे (संपादक शिवनेर मुंबई )

Leave a Reply

Your email address will not be published.