Home » माझी वडवणी » सरपंचांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – संजय आंधळे

सरपंचांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – संजय आंधळे

सरपंचांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – संजय आंधळे
डोंगरचा राजा /आँनलाईन
वडवणी — आखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने शिर्डी येथे दि. 31जुलै रोजी सरपंचांची कार्यशाळा आयोजीत केली आसुन या कार्यशाळेला मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे व जयंत पाटील व दत्ता काकडे यांची उपस्थिती लाभणार आसुन सरपंचांच्या मागण्या सोडवल्या बद्दल व महिन्याला पाच हजार रुपये मानधन दिल्याबद्दल सरपंच संघटनेच्या वतीने शिर्डी येथील कार्यशाळेतील कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येणार आसुन वडवणी तालुक्यातील सरपंच बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहान सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व रूई गावचे सरपंच संजय आंधळे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
गावाचा कारभार हाकणार्या सरपंचाला तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत होते.
गेल्या अनेक वर्षापासुन सरपंचांचा मानधनाचा प्रश्न दुर्लक्षीत होता. परंतु आखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने पाठपुरवा करून करून प्रश्न सोडविले आसुन सरकारकडून नेहमीच सरपंच यांच्या प्रश्ना संदर्भात सकारत्मक भुमीका घेत आसल्याने मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंञी पंकजाताई मुंडे व जयंत पाटील व दत्ता काकडे यांचा शिर्डी येथे 31जुलै रोजी जाहीर सत्कार सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. व सरपंचांचे विवीध प्रश्न निवेदन देऊन मागणी करण्यात येणार यामध्ये सदरील सरपंचाला दहा हजार मानधन देण्यात यावे. व सरपंचांतुन एक आमदार निवडावा व आमदार फंडासारखा सरपंच फंड देण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येणार आहे. शिर्डी येथील कार्यशाळेस येण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली आसुन सरपंच व महिला सरपंच पतीने देखील कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी आहे. तरी तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्यांनी शिर्डी येथील कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहान वडवणी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व रूई गावचे सरपंच संजय आंधळे यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.