वंचित राहणार नाही – आ.आर.टी.देशमुख
डोंगरचा राजा /आँनलाईन
पिकविम्यापासून एक ही शेतकरी वंचित राहणार नाही.
वडवणी — पीक विमा कंपणीने वडवणी तालुका व माजलगाव मतदारसंघातील असंख्य शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विमा 2018-19 पासून काही त्रुटी काढून पाठीमागे ठेवले आहे,ही धक्कादायक माहिती समोर आल्यानन्तर शेतकरी धास्तावले आहेत दुष्काळा चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर मोठा आघात घडला आहे,या बाबत मी स्वतःहा व पालकमंत्री पंकजाताईसाहेब संबंधित अधिकारी व पीकविमा कपनीच्या अधिकाऱ्याशी बोलने झाले असून निर्माण झालेल्या त्रुटी दूर करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची हमी कम्पण्याने दिली असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये ,मी स्वतःहा लक्ष ठेऊन आहे शेतकऱ्याच्या व्यथा मला माहित असून गांभीर्याने प्रश्न हाताळत शेतकऱ्यांना पीक विमा मिळनारच आहे व कोणताच शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार नाही अशा विश्वास आ.आर.टी. देशमुख यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की ,सन 2018-19 चा पीकविमा कम्पण्याने भरून घेतला,पीकविमा भरून घेताना शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे सुद्धा दिली आहेत,गतवर्षी भीषण दुष्काळणे शेतकरी नेस्तनाबूत झाला,हताश झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली तेव्हा अनेक त्रुटी दाखवून पीकविमा कपंनीने काही नावे त्रुटी चे कारण करत शेतकऱ्यांनवर अन्याय केला.मात्र हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे,दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दूषकाळाच्या खाईतुन बाहेर काढण्यासाठी सरकारने तिजोरी उघडी केलेली असताना वडवणी तालुक्यासह माजलगाव मतदार संघातील माजलगाव,व धारूर तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही त्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच या संदर्भात विमा कम्पनी व संबंधित अधिकाऱ्यांना मी स्वतःहा व आपल्या नेत्या ना.पंकजाताईसाहेब बोलल्या आहेत ,सदर पिकविम्या पासून एक ही शेतकरी वंचित राहणार नाही असे पीकविमा कँपणीने आश्वासन दिले आहे , त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळनारच आहे अशा विश्वास आ.आर.टी. देशमुख यांनी व्यक्त केला असून पिकविम्याचे भाडवल करून काही लोक राजकारण करत आहेत,शेतकऱ्याने अफवेला बळी पडु नका,पिकविम्यात राजकारण करणाऱ्याच्या नादी लागू नका ,तुम्हला पीकविमा मिळनारच आहे ,कोणाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही व होऊ पण देणार नाही मी स्वतःहा जातीने या प्रश्नावर लक्ष ठेऊन आहे असे ही आ.देशमुख म्हणाले