आ.धस यांच्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
पाटोदा – जवळपास 375 दात्यांनी केले रक्तदान – नगरपंचायतच्या वतीने अग्निशामक गाडीचे लोकांपर्ण व वृक्षारोपण – आज कारगिल विजयी दिनानिमित्त शहीद कुटुंबियाचा केला सन्मान. पाटोदा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पाटोदा येथे आमदार सुरेश धस मित्रमंडळ ,व भाजपा यांच्या वतीने नगरपंचायत पाटोदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबाराला मोठा प्रतिसाद मिळाला 375 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला पाटोद्यात प्रथमच एवढ्या मोठा प्रतीसाद मिळाला सकाळी 9 वाजता सुरु झालेले हे शिबिर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरूच होते यात जवळपास 375 लोकांनी रक्तदान केले, दुपारी दोन वाजता आमदार सुरेश धस यानीं पाटोदा येथील या शिबीराला भेट देऊन स्वतः रक्तदान केले यावेळीआयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार धस यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सध्या ज़िल्ल्यात शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असून विविध सामाजिक संघटनांनी यापुढे हि असे रक्तदान शिबिर आयोजित करावेत असे आवाहन केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून पंकजाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा चांगला उपक्रम घेतल्याने मनस्वी आंनद होत असल्याचे आमदार धस म्हणाले. यावेळी पाटोदा नगरपंचायतच्या वतीने वृक्षारोपण करून अग्नीशामक दलाच्या गाडीचे लोकार्पण आमदार सुरेश धस यांच्या हस्ते कारण्यात आले तसेच आज कारगिल विजयी दीनानिमित्त शहीद कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नगरसेवक सुरेश धस मित्र मंडळाचे कार्यकर्त भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.