शिवक्रांतीचे शिवजागर अभियान- बजगुडे पाटील
डोंगरचा राजा / आँनलाईन
–1आँगस्ट पासुन मराठवाड्यात शिवक्रांतीचे शिवजागर अभियान..
— आरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ? – गणेश बजगुडे पाटिल
बीड – शिवक्रांती संघटनेची राज्यकार्यकारणी बैठक काल पुणे येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेश (दादा) बजगुडे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याबैठकीमधे विविध विषयावर सविस्तर चर्चा करुन संघटनेची आगामी भुमिका व राज्यपदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच आण्णासाहेब पाटिल महामंडळ व बँका कडुन तरुनांची अवहेलना व दिशाभुल करण्याचे काम होत आहे महामंडळाच्या नावावर तरुणांना वेटिस धरुण धनदांडग्या व्यवसायीकांना मदत केली जात आसल्याचा आरोप गणेश बजगुडे यांनी केला. तसेच आण्णासाहेब पाटिल महामंडळाची कर्ज प्रकरणे सरसकट निकाली काढावीत, मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ रद्द करावेत, मराठा आरक्षण आंदोलनातील मयत हुतात्म्यांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी अद्याप मिळालेली नसुन तात्काळ कार्यवाहि करावी, आरबी समुद्रातील शिवस्मारकांचे काम तात्काळ करावे, कोपर्डि हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम दया किंवा 5000 रुपये मासिक भत्ता दया, शेतकरी कर्ज माफी व आनुदान यावर तात्काळ कार्यवाहि करावी या व ईतर मांगण्यांसाठी मराठवाड्यात आई तुळजाभवानीच्या आशिर्वाद घेवुन तुळजापुर ते वेरुळ शिवजागर अभियान 01 आँगस्ट पासुन राबवण्यात येत आसुन या अभियानात संघटनेची सभासद नोंदणी व गाव तिथे शाखा अभियानाची सुरवात करण्यात येत आसल्याचे संघटनेचे अध्यक्ष गणेश बजगुडे पाटिल यांनी सांगीतले यावेळी, शिवक्रांतीचे प्रदेशउपाध्यक्ष सुधिर पाटिल, प्रदेश सरचिटणीस मुकेश महाडिक, महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई पाटिल, विदर्भ विभागाचे अध्यक्ष पंकज सावंध, युवा नेते संदेश कदम, उस्मनाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेश गिरी, परंडा तालुकाध्यक्ष समाधान चव्हाण, बीड तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, लातुरचे शहराध्यक्ष रोहण शिंदे ईत्यादि प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.