स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने वृक्षरोपण.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
अखिल भारतीय श्री स्वामी सेवा केंद्र पाटोदा शाखा यांच्या वतीने रविवार 21 रोजी महासांगवी रोड येथील सेवा केंद्र येथे वृक्षारोपण व सामुहिक स्तोत्र पठण व पर्जन्यसूक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास पाटोदा शहर व विविध शाळेतील विद्यार्थी हजर होते यावेळी विद्यार्थ्यांना नागरिकांना सेवेकरी यानीं वृक्षारोपणाचे महत्व सांगुन वृक्षारोपण हि काळाची गरज असल्याचे सांगितले, तसेच स्वामी समर्थ केंद्रातही वृक्षरोपण करण्यात आले . उपस्तीथ विद्यार्थ्यांना लिंब, करंजी, बेल, आवळा , चिंच इत्यादी झाडांचे रोपे देऊन त्याचे पालनपोषण करण्याचा सल्ला दिला तसेच सध्या पावसाचे यंदा अल्प प्रमाण असल्याने भरपूर पाऊस पडावा म्हनुन पर्जन्यसुक्त घेण्यात आले .कार्यक्रमास सेवेकरी मोठया संख्येने उपस्तीथ होते.