Home » ब्रेकिंग न्यूज » नागरगोजे यांना राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार जाहीर

नागरगोजे यांना राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार जाहीर

नागरगोजे यांना राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार जाहीर

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

– शांतीवन दिपक नागरगोजे यांना स्व.व्यंकटेश चौधरी राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार जाहीर.

-२८ जुलै रोजी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते वितरण.

ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणमहर्षी स्व. व्यंकटेश चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरावर दिला जाणारा स्व. व्यंकटेश चौधरी राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार यंदा बीड येथील शांतिवनचे समाजसेवक दिपक नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय, साहित्यिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. २१०००/- रू. रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक २८ जुलै २०१९ रोजी सकाळी ११ : ३० वाजता प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) प्रा. नागनाथ निडवदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव संजय बनसोडे, सरपंच ऊर्मिला जगदीश जाधव, चेअरमन बाळासाहेब जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पुरस्कार संयोजन समितीचे सिध्दार्थ बोडके, प्रा. एम.व्ही. स्वामी, प्रा. एन.आर.लांजे, रसूल पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.