Home » माझा बीड जिल्हा » झोपडीत पेटविला ज्ञानाचा दिवा..

झोपडीत पेटविला ज्ञानाचा दिवा..

झोपडीत पेटविला ज्ञानाचा दिवा..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

— गरीबांच्या झोपडीत पेटविला ज्ञानाचा दिवा ,
गुरू आनंद महिला प्रतिष्ठानचा अनोखा सोहळा

बीड- गुरू आनंद महिला प्रतिष्ठान बीड संचलित प्रा.शा.माणकापूर शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम श्री . ज्ञानोबा जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
त्या प्रसंगी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.सीमाताई मनोज ओस्तवाल,प्रमिलाताई केंद्रे,समर्थ विद्यालयाचे शिक्षक तथा मुप्टा शिक्षक संघटना प्रा. विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष आयु.शरद मगर सर, रोहित लंबे, अमर पंडित, कुणाल हाडुळे इ. यांच्या हस्ते शाळेतील गोरगरीब,वंचित विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले,त्याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळचे मु .अ. श्री . भास्कळ सर यांनी गुरू आनंद महिला प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षा पासून हा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले, गोरगरिब,वंचित मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ही आजची लहान बालके उद्याची सुज्ञ नागरीक तयार होऊन या समाजाच्या उन्नतीसाठी चांगले कार्य करतील व एक आदर्श समाज निर्माण करतील व समाचे ऋण फेडतील या साठी प्रतिष्ठान विद्यार्थ्यांची पायाभरणी करत आहे. तसेच गोरगरीबांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा तेवत ठेवण्याचे कामही प्रतिष्ठान करत असल्याचे मु . अ . यांनी आवर्जून सांगितले . यातून चांगले विद्यार्थी घडोत अशी अपेक्षा व्यक्त केली,या नंतर शरद मगर सरांनी आपल्या मनोगतामध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान ची महती व्यक्त करताना हे प्रतिष्ठान निस्वार्थ सेवा करून गोरगरिबांची,वंचित घटकांची शैक्षणिक गरजा भागवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण करत आहे,वह्या वाटपा बरोबरच आम्ही गणवेश वाटप,स्कूलबँग वाटप करण्याचा प्रयत्न करणार आहोत ,या मोफत शालेय साहित्य वाटपाचा सर्व विद्यार्था्नी लाभ घ्यावा व आपले जीवन यशस्वी घडवावे एवढीच अपेक्षा व्यक्त केली.
हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्याचे कष्ट गुरू आनंद महिला प्रतिष्ठान बीड संचलितअध्यक्ष ,सचिव यांनी घेतले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published.