Home » माझी वडवणी » विजयासाठी दक्ष रहावे- आ आर टी देशमुख

विजयासाठी दक्ष रहावे- आ आर टी देशमुख

विजयासाठी दक्ष रहावे- आ आर टी देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

— भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा विजयासाठी दक्ष रहावे- आ आर टी देशमुख.

माजलगांव – आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा लोकसभे प्रमाणे विजय संपादन करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे, कार्यकर्त्यांच्या कष्टावर व संघटनेच्या कार्यावरच भाजप पक्ष दुसऱ्यांदा सत्ते पर्यंत पोहचला असून विधानसभेच्या निवडणूकीत पूर्ण विजय संपादित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे असे आवाहन बूथ कमिटीच्या बैठकी प्रसंगी आ आर टी देशमुख यांनी केले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजलगाव तालुक्यातील भाजपा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन आ आर टी जिजा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या वेळी माजी सभापती नितीन नाईकनवरे, नगराध्यक्ष सहाल चाऊस, विजय लगड, रोहित भैया देशमुख,डी सी सी उपाध्यक्ष गोरख धुमाळ,तालुकाअध्यक्ष हनुमान कदम,विकास कदम,राम पाटील, संजय आंधळे, यांची उपस्थिती होती
या प्रसंगी बोलताना आ आर टी देशमुख यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत विजय संपादित करण्यासाठी लोकसभेप्रमाणे नियोजन करून कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावेत भारतीय जनता पक्षाच्या विजयात कार्यकर्त्यांचाच सिंहाचा वाटा आहे पक्षात गटबाजी नको माजलगावचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचाच असावा ही सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे बीड जिल्ह्या हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला होता आहे आणि भविष्यातही राहील पंकजाताईचे हात बळकट करून त्यांच्या पाठीशी ठाम ताकद उभी करण्यासाठी केवळ माजलगाव नाही तर जिल्ह्यातील सर्व आमदार हे युतीचे असणे गरजेचे आहे या करिता आता पासूनच नियोजन बध्द कामाचा आराखडा तयार करून आगामी तीन महिन्यात पुन्हा पूर्ण विजय संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे असे आवाहन आ आर टी देशमुख यांनी केले सुरवातीला पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी जे पी नड्डा व प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव बैठकीत पार पाडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमान कदम यांनी तर सूत्र संचालन बाबासाहेब आगे यांनी केले या वेळी शहराध्यक्ष माणिक दळवे, दत्ता महाजन, एस नारायण, दत्ता धोत्रे,पी जी सोळंके,मुख्यमंत्री वॉर रुमचे दत्ता कदम,शिवाजी तौर, गोविंद मस्के, भाजप नगरसेवक सचिन डोंगरे, इम्रान खान, मथुरादास घायतिडक,भगीरथ शेजुळ, बाळासाहेब क्षीरसागर, रामेश्वर चव्हाण,गणेश बडे, बाळासाहेब चोले, यांची सह सर्व सरपंच उपसरपंच,बूथ प्रमुख यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय रांजवन, त्रिंबक धिरडे, अशोक माने यांनी कष्ट घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.