गुरुजनांचा संस्कार भारतीच्या वतीने गुरू गौरव.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
गुरुपौर्णिमे निमित्त बीड शहरात विविध क्षेत्रात स्पृहणीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा संस्कार भारती बीडच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. सन्मानपत्र आणि गुलाबाचे रोपटे स्वीकारून गुरुजनांनी हा सन्मान स्वीकारला.
संस्कार भारतीच्या वतीने प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा नटराज पूजन म्हणून साजरी केली जाते आणि गुरुजनांचा सन्मान केला जातो. यावर्षी शहरातील सर्वश्री सी .डी. देशमुख ( विधी ),डॉ .सुदाम मोगले ( आरोग्य ), प्राचार्य डॉ .संजय शिरोडकर ( शिक्षण ) सौ.सुमती पिंगळे ( साहित्य ), यशवंतराव तालखेडकर ( अध्यात्म ),शेख अजहर ( क्रीडा ) निर्मलाताई खटोड ( सामाजिक ), दगडू पुरी ( पत्रकारिता ), द्वारकादास फटाले ( नाट्यकला ), कमलबाई हुलजुते ( धार्मिक ), ज्ञानोबा कुटे ( वारकरी संप्रदाय ), यांचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. संस्कार भारती आमच्यासारख्या कलावंत,कार्यकर्ते ,साधक यांचा स्वतः शोध घेऊन सन्मानित करते हे कौतुकास्पद आणि प्रोत्साहन देणारे असल्याची भावना यावेळी सत्कारमूर्तींनी व्यक्त केली. या सन्मान सोहळ्यात संस्कार भारतीचे देवगिरी प्रांताध्यक्ष भारतअण्णा लोळगे, जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे, कुलदीप धुमाळे, वासुदेव निलंगेकर,उदय कसरेकर, महेश वाघमारे,प्रज्ञाताई रामदासी, स्नेहल पारगावकर,सोनल पाटील,संतोष पारगावकर, प्रमोद कुलकर्णी,अनिल कुलकर्णी, प्रा.राहुल पांडव, गणेश तालखेडकर,प्रकाश मानूरकर,सुरेश साळुंके,जगदीश जाधव,मंगेश मांडे,महेश देशमुख,दत्ता घोडके हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.