Home » महाराष्ट्र माझा » शासनास प्रवृत्त करू ! – उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे

शासनास प्रवृत्त करू ! – उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे

शासनास प्रवृत्त करू ! – उपसभापती डॉ.गोऱ्हे

डोंगरचा राजा / आँनलाईन

–जिल्ह्यातील गर्भ पिशवी शस्त्रक्रिया प्रश्नाबाबत कालमर्यादेत निर्णयासाठी शासनास प्रवृत्त करू।

–विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

बीड – जिल्ह्यातील गर्भपिशवी शस्त्रक्रियांच्या अनुषंगाने चौकशी समितीने या प्रश्नाच्या अनुषंगाने संबंधित महिला, महिलांच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी, खाजगी डॉक्टरांच्या संघटनांचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी -कर्मचारी तसेच गावपातळीवरील महिला कर्मचारी ,आशा सेविका, याच बरोबर ऊसतोड कामगारांच्या संबंधित मुकादम, कामगार विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने सखोल चर्चा केली .
विषयाशी संबंधित अनेक सामाजिक, आर्थिक पैलूंचा विचार करता या प्रश्नाबाबत कालमर्यादेत कार्यवाही होण्यासाठी शासनास प्रवृत्त करू, यासाठी 3 बैठका झाल्या असून अजून दोन बैठका घेऊन चौकशी समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करेल तसेच यासाठी आरोग्य मंत्र्यांशी देखील तपशीलवार चर्चा केली जाईल असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात त्यांनी या विषयाशी संबंधित विविध समाज घटकांशी आढावा बैठक घेतली याप्रसंगी उपसभापती डॉक्टर गोऱ्हे बोलत होत्या यावेळी सभागृहात आमदार विद्या चव्हाण सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ . प्रदीप व्यास , जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ.शिल्पा नाईक, आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले , मराठवाडा विभागाचे कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी.आर. पवार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आदी उपस्थित होते.
यासाठी चौकशी समितीने उपस्थित प्रतिनिधींना आपली मत मांडण्यासाठी वेळ दिला होता यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन,सीटू, जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र ऊस तोड कामगार संघटना शिवसेना महिला आघाडी जिल्हा रुग्ण कल्याण समिती यासह स्वयंसेवी संस्था चे प्रतिनिधी यांनी समितीसमोर आपापले म्हणणे सादर केले . या आढाव्यानंतर अजूनही या प्रश्नाबाबत संबंधितांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात द्यावेत असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याच बरोबर सदर प्रश्नाशी संबंधित पीडित महिलांचे इन कॅमेरा चर्चा केली. याप्रसंगी संवेदनशील होत . उपसभापतींनी सद्यस्थितीत या महिलांसाठी आवश्यक रेशन द्वारे धान्यपुरवठा त्यांच्या आरोग्यविषयक तपासण्या आणि उपचारासाठी आरोग्य यंत्रणांनी करायची कार्यवाही या अनुषंगाने तातडीने प्रशासनास निर्देश दिले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ गोऱ्हे म्हणाल्या, हा विषय संवेदनशील आणि नाजूक आहे. याबाबत खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे देखील ऐकून घेतले आहे. सदर विषयाबाबत तपासणी आणि उपचार उपचारांसाठी नियमावली तयार करून सर्व रुग्णालयांसाठी बंधनकारक करणे गरजेचे राहील .सदर नियमावलीसाठी राष्ट्रीय पातळीवरील ‘फडेरेशन ऑफ गायनॅकाॅलॉजीस्ट ऑफ इंडिया ‘यांच्याकडून मार्गदर्शक तत्व निश्चित करून त्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शिफारस केली जाईल.
त्या पुढे म्हणाल्या ऊसतोड महिला कामगारांच्या दृष्टीने आरोग्यपूर्ण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्याची शिफारस करू यासाठी त्यांना ऊसतोड हंगामावर जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी आणि प्रत्यक्ष हंगामाच्या कालावधीत संबंधित ठिकाणी उपचार आदी मिळतील यासाठी सुविधा तसेच कामगार आयुक्त कार्यालयामार्फत त्यांच्या नोंदणी करून शासनाच्या इतर योजनांचा लाभ देणे , ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत , मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करणे , साखर आयुक्तांनी यासाठी संबंधित साखर कारखान्यांमार्फत स्वच्छतागृहे , रहाण्याच्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करणे अशा विविध प्रश्नांबाबत समिती अहवाल देईल असे उपसभापती डॉ गोऱ्हे म्हणाल्या.
याप्रसंगी आमदार विद्या चव्हाण, प्रधान सचिव डॉ व्यास, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विविध विषयांशी संबंधित प्रतिनिधींशी चर्चा आणि प्रत्यक्षात होणारी कार्यवाही या अनुषंगाने माहिती दिली.

*विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आज सकाळी वंजारवाडी येथे भेट*

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सकाळी बीड तालुक्यातील वंजारवाडी येथे भेट दिली त्यांनी गर्भपिशवी शस्त्रक्रिया झालेल्या संबंधित महिला तसेच आशा सेविका , अंगणवाडी ताई यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विद्या चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, बीजे वैद्यकीय महाविद्यालयच्या विभाग प्रमुख डॉक्टर शिल्पा नाईक, लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी आर पवार आदी होते. यावेळी त्यांनी संबंधित महिलांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या.
00000

Leave a Reply

Your email address will not be published.