Home » महाराष्ट्र माझा » विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व वृक्षारोपण..

विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व वृक्षारोपण..

विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व वृक्षारोपण..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

-आत्मविश्‍वास असल्यास यश नक्की मिळते – विजय कबाडे

-संतोष सोहनी, विनोद पिंगळे, राहुल नवले, विनोद ललवाणी यांचा अभिनव उपक्रम

जीवनात नेहमी आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करा. मन लावून शिक्षण घ्या, शिक्षणाने अनेकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. जीवनातील ध्येय प्राप्त करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्‍वास ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले.
जिल्हा व शहर व्यापारी महासंघ, पाली ग्रामस्थ यांच्यावतीने व संतोष सोहनी, विनोद पिंगळे, राहुल नवले, विनोद ललवानी यांच्या पुढाकारातून बीड तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेतील 600 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप श्री. कबाडे, महाराष्ट्र कॉमर्स चेंबर्स ऑफ कॉमसचे उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, इंजि. अर्जुनराव जाहेर पाटील, पोलिस उपाधिक्षक भास्कर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी शाळेतील परिसरात विविध प्रकाराचे 101 झाडांच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण दाभाडे (सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन), बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य सानप सर, न.प.चे माजी उपाध्यक्ष अमृत काका सारडा, राज्यस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रामलाल छाजेड सर, राजु तापडीया, नगरसेवक शुभम धुत, अनिल साळुंके, बबनराव शिंदे (अध्यक्ष रोटरी क्लब, अनिकेत भिसे (अन्न प्रशासन अधिकारी), स्वाभिमानी संघटनेचे सचिन उबाळे, माजी जि.प. सदस्य वचिष्ठ नाना नवले, उद्योजक संपतलालजी कोटेचा, सरपंच दशरथअप्पा राऊत, उपसरपंच लक्ष्मणतात्या नवले, प्रमोद निनाळ, भास्कर गायकवाड यांच्यासह पाली ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलतांना विजय कबाडे म्हणाले की, शालेय जीवनात अभ्यासाकडे लक्ष दिले तर पुढे त्याचा नक्कीच फायदा होतो. आज बीड जिल्ह्यातही मोठे अधिकारी आहेत. ज्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात एक ध्येय निश्‍चीत करुन ध्येय प्राप्तीसाठी मेहनत, जिद्द ठेवून अभ्यास केला पाहिजे. या शाळेमध्ये शेतकर्‍यांची मुलं, मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणात आधार मिळावा त्यासाठी संतोष सोहनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी 600 विद्यार्थ्यांसाठी जो वह्या वाटपाचा उपक्रम घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. सोहनी यांचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम आहे. अशेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो असे कबाडे म्हणाले. यावेळी सत्यनारायण लाहोटी, अर्जुनराव जाहेर पाटील, प्राचार्य सानप सर, प्राचार्य छाजेड, बबनराव शिंदे यांनी आपल्या भाषणात आयोजकांचे कौतूक केले.
यावेळी शाळा परिसरात गुलमोहर, सप्तपरणी, लिंब, वड आदी 101 रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश साळुंके यांनी केले तर आभार आघाव सर यांनी मानले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लाड यांनी केले.

चौकट
200 विद्यार्थ्यांना वैष्णौ देवीचे दर्शन घडविणार्‍या संतोष सोहनी यांचे मान्यवरांकडून कौतूक
शहरातील उद्योजक तथा वैष्णौदेवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष संतोष सोहनी यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. यावर्षी पाली येथील जि.प. शाळेतील 200 विद्यार्थ्यांची सहल जम्मु कटारा येथील वैष्णौदेवी येथे दर्शनासाठी नेली होती. सोहनी यांच्यामुळे विद्यार्थ्यांना वैष्णौदेवी दर्शनाचा योग आला. पाली जि.प. शाळा ही महाराष्ट्रातील एकमेव अशी शाळा आहे की, वैष्णौ देवी मंदिर येथे परराज्यात जावून आली. दरम्यान अमृतसर, वाघा बॉर्डर, शिवखोडी, जम्मु कटरा ते वैष्णौदेवी मंदिर अशी सहल नेण्यात आली होती. त्यांच्या या उपक्रमाचे बुधवारी वह्या वाटपा दरम्यान उपस्थित मान्यवरांकडून कौतूक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.