Home » माझा बीड जिल्हा » रुईकर क्लासेस मध्ये गुरुपौर्णिमा साजरी..

रुईकर क्लासेस मध्ये गुरुपौर्णिमा साजरी..

रुईकर क्लासेस मध्ये गुरुपौर्णिमा साजरी..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

बीड शहरातील रुईकर क्लासेस मध्ये मंगळवारी सगळ्या विद्यार्थ्यांनी गुरूंप्रति आदर व्यक्त केला, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर, इंजिनियर संतोष पारगावकर,स्नेहा पारगावकर,मेघा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव केला.
आई, वडील, शिक्षक हे आपले गुरू आहेत,त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे त्याचा उपयोग करून जीवनात यशस्वी व्हा असा संदेश मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर यांनी दिला,तर गुरुचे पाठबळ असल्यास अशक्य गोष्टी सहज शक्य होतात अस मत संतोष पारगावकर यांनी व्यक्त केलं .रुईकर कोचिंग क्लासेस च्या संचालिका दीपा रुईकर यांनी यावेळी आपल्या गुरुची महती सांगितली .
यावेळी मागील वर्षीच्या परीक्षेत ए प्लस मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या 30 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी रुईकर आणि आदिती आबुज यांनी केले. आभार माधुरी अवसरे हिने व्यक्त केले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी ,पालक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.