Home » ब्रेकिंग न्यूज » विचारांमध्ये सकारात्मकता येते – अ.पो.अधिक्षक कबाडे

विचारांमध्ये सकारात्मकता येते – अ.पो.अधिक्षक कबाडे

विचारांमध्ये सकारात्मकता येते – अ.पो.अधिक्षक कबाडे

अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन

अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढून विचारांमध्ये सकारात्मकता येते – अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे

सिरसमार्ग येथे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कोणतेही काम करायला काहीतरी प्रेरणा हवी असते, अर्थात प्रेरणा विकत मिळत नाही तर ती मनातून यावी लागते. स्वत:चा अंतरात्मा हा एक टोकदार, पण प्रामाणिक टीकाकार असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण हीच अनमोल प्रॉपर्टी आहे, मन लावून अभ्यास केला पाहिजे, अभ्यासामुळे आत्मविश्‍वास वाढून विचारांमध्ये सकारात्मकता येते असे प्रतिपादन बीडचे अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांनी येथे केले.
गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वतीने गरीब व गरजवंत, होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम शनिवार दि. 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सीमा ओस्तवाल यांनी करुन, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यामागची भूमिका विषद केली. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी बीडचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय कबाडे हे होते. तर प्रमुख प्राहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, वैष्णौ देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष सोहनी, प्रसिध्द व्यापारी राजेंद्र मुनोत, वैभव स्वामी, सय्यद सज्जाद , दिनेश गुळवे, रोटरी बीड क्लब अध्यक्ष बबन शिंदे, सिरसमार्ग संस्थेचे सचिव सुभाष पवळ,रोटरीचे सचिव मुळे,प्रविण पवार, विजयकुमार करपे,राजेशओस्तवाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अ.पो. अधिक्षक विजय कबाडे म्हणाले की, काळाची पावले ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे, वाचन व गुरुजनांन सोबत वेळोवेळी संवाद साधणे ही आपल्याला जमले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात स्वत:ला शिस्त लावून घेणे हे आपली किंमत वाढविण्यासाठी गरजेचे असते. तुम्ही जर शिस्तबद्ध असाल तर आपल्या योग्यतेचा व आपल्या उंचीचा आलेख कसा वाढवायचा याची ब्लू प्रिंट मनात नेहमीच तयार असायला हवी.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून गुरु आनंद महिला प्रतिष्ठान नेहमीच समाजाप्रती सलोखा राखण्याचे काम करत आहे असे सांगितले ,गरजवंत विद्यार्थ्यांना 3500 वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास दुगड शेठ, डॉ.मनोज ओस्तवाल, राजेश ओस्तवाल, सिरसमार्ग येथील समस्त गावकरी महिला मंडळ व विद्यार्थी व शाळेचे शिक्षक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद मगर सर यांनी केले. व शेवटी आभार सुभाष पवळ सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.