बांधकाम कामगारांना सुरक्षा किट चे वाटप
डोंगरचा राजा /आँनलाईन
लाल बावटा बांधकाम कामगार संघटना(सिटू)च्या प्रयत्नांमधून राजा टाकळी येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा किट चे वाटप..
आज दिनांक 14 जुलै रोजी राजा टाकळी तालुका घनसावंगी येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नांमधून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या 10 हजार रुपये किमतीच्या सुरक्षा किट चे वाटप जेष्ठ पत्रकार विष्णुभाऊ आर्दड व संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ गोविंद आर्दड यांच्या हस्ते 120 कामगारांना वाटप करण्यात आले यावेळी गावातील पोलीस पाटील तुकाराम आर्दड सामाजिक कार्यकर्ते कालिदास राऊत यांनी उपस्तीती होती
कार्यक्रमामध्ये बोलताना कॉम गोविंद यांनी सांगितले की बांधकाम कामगारांना मंडळ कडुन 29 विविध कल्याणकारी योजना मिळतात त्या चा लाभ त्यांना मिळून घ्यायचा असेल आणि प्रशासनाकडून त्याची योग्य अंमल बजावणी करून घ्यायची असेल तर संघटना मजबूत केली पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष केला पाहिजे यापुढे कामगारांना हकच घरकुल मिळण्यासाठी संघटना लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले या विष्णुभाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या उत्तम कामगिरी बद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या
यावेळी बाळराजे आर्दड सोनू भोरे नामदेव तौर परमेश्वर मोरे शिवाजी तौर मारोती आर्दड संतोष भोसले कुलदीप आर्दड बाबुराव देवकुळे यांच्यासह मोठयसंख्येने कामगारांची उपस्तीती होती
सोनू भोरे