Home » माझा बीड जिल्हा » धूरमुक्त महाराष्ट्रसाठी अंत्योदय अभियानाचा शुभारंभ – जिल्हाधिकारी पांडेय

धूरमुक्त महाराष्ट्रसाठी अंत्योदय अभियानाचा शुभारंभ – जिल्हाधिकारी पांडेय

धूरमुक्त महाराष्ट्रसाठी अंत्योदय अभियानाचा शुभारंभ – जिल्हाधिकारी पांडेय

डोंगरचा राजा / आँनलाईन

— धूरमुक्त महाराष्ट्रसाठी जिल्ह्यात  15 जुलै पासून पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

– जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय

– 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत अभियान राबविण्यात येणार
– अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालक मंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रशासनास सूचना
– सर्व १०० % कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन
– यासोबत पात्र कुटुंबांना 100% शिधापत्रिका वाटप , 100% धान्य वाटप हे उद्दिष्ट

बीड, दि.13:- धूरमुक्त महाराष्ट्रसाठी बीड जिल्ह्यात सोमवार 15 जुलै 2019 पासून पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी सांगितले .
राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात तर्फे राज्यात 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी १०० % सर्व कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे आणि या अंतर्गत पात्र कुटुंबांना 100% शिधापत्रिका वाटप, 100% धान्य वाटप हे उद्दिष्ट देऊन याचा शुभारंभ राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अनुषंगाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण कौशल्य विकास माजी सैनिकांचे कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना या अभियानात सहभागी होऊन अभियान समाजातील सर्व पात्र लाभार्थी पण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने ग्राम विकास महिला व बालविकास मंत्री तथा पालक मंत्री पंकजा मुंडे आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रशासनास सदर अभियान जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या आहेत.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधावाटप नियंत्रक यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने सर्व संबंधित कार्यालयांनी नागरिकांकडून प्राप्त झालेले अर्ज डिजिटायझेशन करून कार्यवाही पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावेत, असे सांगितले आहे.
अशी होणार अभियानाची अंमलबजावणी
सदर अभियान राज्यभर राबवितांना यासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, उपायुक्त पुरवठा हे या अभियानासाठी कार्यवाही करतील. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी याचे नियंत्रण करतील प्रत्यक्षात तालुकास्तरावर तहसीलदार व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार , गावपातळीवरील तलाठी, सर्वच संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यासाठी काम करतील.
धूरमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व पात्र लाभार्थ्यांना पर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हास्तरावरील जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप यांनी पेट्रोलियम गॅस कंपन्यांचे जिल्हा नोडल ऑफिसर यांच्याशी समन्वय साधून नियोजन करावेत. जिल्हाभरात शिबिरांचे आयोजन करणे, तसेच गॅस वितरकांमार्फत, रास्त भाव दुकानदारांमार्फत अर्ज दाखल करून घेणे, याबरोबरच कोणत्याही रकमे शिवाय गॅस जोडणी देण्याबाबत जनजागृती देखील करतील.
धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्व कुटुंबांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप आणि धान्य वाटप करण्याचे देखील उद्दिष्ट निर्धारित करताना ग्रामीण-शहरी, आदिवासी क्षेत्रातील समाजातील दुर्बल ,वंचित घटक यांना प्रयत्न आहे. नवीन गॅस जोडणी करता लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे शिधापत्रिका क्रमांक, आधार कार्ड, बँक तपशील देणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.