ना.मुंडे,खा.डाॅ.मुंडे यांच्या हस्ते हज यात्रेकरूंना प्रतिबंधात्मक लस.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीडला पासपोर्ट कार्यालय सुरू करून हज यात्रेकरूंची गैरसोय दूर केली – खा.डॉ.प्रितमताई मुंडे
परळी दि.१३ —- हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना पासपोर्ट मिळवण्यासाठी पूर्वी मुंबई, नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागत असे. हज यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये याकरिता पाठपुरावा करून बीड येथे पासपोर्ट कार्यालय मंजूर करून घेतले. या पासपोर्ट कार्यालयामुळे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंना मोठा लाभ होत असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज येथे सांगितले.
परळी येथील उप जिल्हा रुग्णालयात हज यात्रेला जाणाऱ्या ६७ यात्रेकरुंना प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास तथा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात हज यात्रेकरूंसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरण कक्षाचे उदघाटनही यावेळी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी हज यात्रेकरूंशी मनमोकळा संवाद साधत त्यांना सुखकर यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खा.डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या “ यापूर्वी लसीकरण करण्यासाठी हज यात्रेकरूंना जिल्हा रुग्णालयात जावे लागत असे यात्रेकरूंची गरज बघून लसीकरणाची सुविधा परळी ग्रामीण रुग्णालयात आपण उपलब्ध केली आहे. अल्पसंख्याक बांधवांच्या प्रश्नांना सोडवणे हे आपले कर्तव्य आहेच परंतु लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची सर्वधर्म समभाव आणि सर्वसमावेशक राजकारण हे संस्कार मुंडे साहेबांनी आम्हावर केले आहेत.
*विकासाच्या राजकारणासाठी दुऑ करा*
——————————-
जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असताना ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वाना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करत आहोत. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असताना सर्वसमावेशक व सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असेच राहावेत यासाठी अल्लाहकडे दुवा करा असे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी उपस्थित हज यात्रेकरूंना केले. यावेळी संसदेत पहिला प्रश्न उर्दू भाषेचा विचारता आला हे आपले भाग्य असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.
भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ शालिनी कराड, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात, उप जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ रामेश्वर लटपटे, शेख अब्दुल करीम, वहाजुद्दीन मुल्ला, ताजखान पठाण खालेद राज, जावेद राज, जमील टेलर आदीसह हज यात्रेला जाणाऱ्या महिलांसह यात्रेकरू उपस्थित होते.
••••