Home » माझा बीड जिल्हा » पारदर्शकतेने अतिक्रमण काढा – अँड.अजित देशमुख.

पारदर्शकतेने अतिक्रमण काढा – अँड.अजित देशमुख.

पारदर्शकतेने अतिक्रमण काढा – अँड.अजित देशमुख.

डोंगरचा राजा / आँनलाईन

नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत काहींवर अन्याय ?

– पारदर्शकतेने अतिक्रमण काढा
– अँड. अजित देशमुख.

बीड – अतिक्रमण करणे ही बाब चुकीची आहे. मात्र नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढताना काही अतिक्रमण काढणे आणि काही तसेच ठेवणे ही देखील मोठी चूक आहे. अशा लोकांनी दर्शक पणाने काम करावे. कोणावर जाणीवपूर्वक अन्याय करणे योग्य होणार नाही. कधी तरी झोपेतून उठायचं आणि अतिक्रमण विरोधी मोहीम राबवायची, ही बाबच मुळात चुकीची आहे. त्यामुळे ज्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण होत आहे अथवा झालेली आहेत, त्यावर नियंत्रण न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून अतिक्रमण काढण्यासाठी येणारा खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

बीड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम गेल्या दोन चार दिवसा पासून चालू आहे. ही मोहीम कायद्याला धरून आहे, यात कसलाही वाद नाही. मात्र मुळात अतिक्रमण होत असताना अधिकारी झोपा काढतात का ? हा मुद्दा सध्या जनतेला सतावतोय. ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अतिक्रमण झालेली आहेत, ती सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी येणारा खर्च त्या – त्या विभागात नियंत्रण ठेवण्याचे काम जो पगारी नोकर करत आहे, त्याचे आहे. मात्र हा नौकर नियंत्रण ठेवण्यात कसूर करत असेल अथवा संगणमत करत असेल, तर अशा नोकराच्या पगारातून अतिक्रमण काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा खर्च वसूल होणे गरजेचे आहे.

रस्त्यावर झालेली अतिक्रमणे ही पादचाऱ्यांना नेहमीच अडचणीचे ठरतात. या अतिक्रमणामुळे अपघात होतात. सार्वजनिक जीवनात लोकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. कुठेही अतिक्रमण करणे चुकीचे आहे. अतिक्रमण धारकांचे कोणीही समर्थन करणार नाही. मात्र अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविणाऱ्या लोकांनी जर काही अतिक्रमणे काढली आणि काही ठेवली, तर हे योग्य नाही. याचा विचार मुख्याधिकार्‍यांनी आणि तेथील सर्व संबंधितांनी करणे गरजेचे आहे. अशा दोषींवर ठोस कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे.

या मोहिमेसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे अतिक्रमण का होऊ दिली जातात, अतिक्रमण होत असताना अधिकारी झोपलेले असतात का, बेकायदेशीर कामावर नियंत्रण का ठेवले जात नाही आणि अचानक झोपेतून उठल्या सारखे अधिकारी का वागतात ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे होत आहेत. त्यामुळे अतिक्रमणे काढताना कोणताही दुजाभाव करू नये. पारदर्शकतेने काम करावे अन्यथा नगर पालिकेसमोर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.