कु.शिंदे प्राचीची निवड -आ.धस,आ.मेटे यांनीही केले कौतुक
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
पाटोदा भारतीय विज्ञान संस्था व संशोधन संस्था पुणे संचलित संपन्न झालेल्या परीक्षेत कु प्राची सूर्यकांत शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला असून पुढील शिक्षणासाठी तिची तिरुपती येथे निवड करण्यात आली असून तिच्या या दैदिप्यमान यशाचे आ. सुरेश धस, व,आ विनायक मेटे यांनीही अभिनंदन केले आहे.
पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील प्राथमिक शिक्षक सूर्यकांत शिंदे यांच्या कन्येने भारतीय विज्ञान संस्था व संशोधन परीक्षेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून,दि ०७जून रोजी ( I, i, S,E, R ) परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र झाल्याबद्दल तिची तिरुपती येथे या विज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली आहे.indian institude Off science Education and Research या संस्थेमार्फत पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमा साठी कु. प्राची शिंदे हिची निवड करण्यात आली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, तौरे सर, मुसळे सर, चौरे सर, सभापती सौ. सोनवणे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, प. स. सदस्य महेंद्र नागरगोजे आदींनी अभिनंदन केले आहे.