Home » माझा बीड जिल्हा » न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा- ॲड.एन एल जाधव

न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा- ॲड.एन एल जाधव

न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा- ॲड.एन एल जाधव

डोंगरचा राजा / आँनलाईन

पाटोदा — दि 7 रोजी पाटोदा येथे औरंगाबाद उच्च न्यायालयाचे विधी तज्ञ ॲड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव साहेब यांनी पाटोदा येथे कायदेविषयक ज्ञान व मार्गदर्शन करण्यासाठी पाटोदा शहरातील तरुण, युवक व वडिलधारी मंडळी ज्येष्ठ नागरिक हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित असतांना वकील साहेबांनी माहितीचा अधिकार, जनहित याचिका, मुलभुत अधिकार ,कर्तव्य जाणीव व तरुणांना कायदेविषयक वेगवेगळी प्रकारे माहिती दिली. सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी आम्ही न्यायव्यवस्था मध्ये काम करतो. कायद्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे.प्रमाणिक लोकांमुळे न्याय व्यवस्था टिकून आहे. देशाचा सक्षम नागरिक घडला पाहिजे ,अन्याय सहज होतो पण न्याय मिळण्यासाठी वेळ लागत असतो.जनहितार्थ याचिका व माहितीच्या कायद्याचा अधिकारा मुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळू शकतो व त्यांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण होते अन्न वस्त्र निवारा एवढीच माणसाची गरज नसून स्वच्छ पाणी चांगले रस्ते नाल्या या सर्व मूलभूत गरजा आहेत.
या सर्व बाबींवर प्रकाश टाकून त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. माधवराव जाधव, ॲड.औटे ,ॲड. संभाजी कोकाटे ॲड. सय्यद वाहब, ॲड. सय्यद अशरफ, ॲड. अरुण कोठुळे, ॲड. कांकरिया ,नगरसेवक सुभाष आडागळे, विष्णुपंत घोलप ,अब्लूक घुगे ,गोरख झेड, गणेश कवडे ,एल आर जाधव, शिवभूषण जाधव, चाऊस मामा, बिनवडे भाऊ ,सोनू शेवाळे, निजाम फौजी, शहादेव बांगर, शिवाजी गर्जे, बापू नाईकनवरे, लक्ष्मण भाकरे, विशाल जाधव, सुनील जावळे ,सय्यद रियाज, सुलेमान मकरानी ,मुक्रम पठाण, सय्यद आजीम ,फैसल चाऊस, रवी व दिनेश नारायणकर, दिपक आडागळे ,पत्रकार हमीद पठाण, सचिन गायकवाड, या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रस्ताविक नवक्रांती विचार मंच प्रतिष्ठान चे अध्यक्ष सय्यद सज्जाद यांनी केले. व सर्वांचे आभार शेवटी शिवभूषण जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.