Home » ब्रेकिंग न्यूज » “आयडिया” नकोच सरजी…

“आयडिया” नकोच सरजी…

“आयडिया” नकोच सरजी…

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अन् त्रस्त वडवणीकर म्हणू लागले ‘आयडिया’ नकोच सरजी…

– पाच दिवसांपासून वडवणी तालुक्यातील आयडियाची सेवा कोलमडली

– हजारो ग्राहक दुसरे दर्जेदार नेटवर्क स्विकारण्याच्या मानसिकतेत

वडवणी – मोबाईल नेटवर्किंग सिमकार्ड कंपनीमध्ये आयडिया या कंपनीला भारतातील सर्वाधिक वेगाने व सर्वाधिक ग्राहक असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र याच आयडिया कंपनीला आता घरघर लागली आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण मागील पाच दिवसांपासून वडवणी शहर व तालुक्‍यातील सर्वच ठिकाणी आयडिया नेटवर्कमध्ये मोठा बिघाड झालेला आढळून येत असून हजारो ग्राहकांचा एकमेकांशी कसलाच संपर्क होत नसून ना कॉलिंग ना इंटरनेट या दोन्ही सुविधा बंद असल्यामुळे सर्व ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हॉट ऍन आयडिया सरजी असे म्हणत स्वतःचा धिंडोरा पिटविणाऱ्या आयडियाला त्रस्त वडवणीकर म्हणू लागले आहेत की आयडिया आता नकोच सरजी. परिणामी आयडियाचे हजारो ग्राहक दुसऱ्या दर्जेदार नेटवर्कची सुविधा स्विकारण्याच्या मानसिकतेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धावत्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात आजच्या घडीला मोबाईल या उपकरणाला प्रथम पसंती मिळते. कारण बसल्या ठिकाणी आणि पाहिजे त्या वेळेस कोणतेही काम याद्वारे करता येते किंवा संपर्क साधून माहिती मिळविता येत असल्याने आज प्रत्येक व्यक्ती जवळ आणि प्रत्येकाच्या खिशात साधारणपणे दहा ते वीस हजार रुपये पर्यंतचा मोबाईल हँडसेट दिसून येतो. परंतु त्या हँडसेट मधील सिमकार्डचे नेटवर्क व्यवस्थित नसेल तर त्या हँडसेटचा एखाद्या शोभेची वस्तू याप्रमाणेच वापर होतो. आयडिया कंपनीच्या आशीर्वादाने वडवणीकरांना याचा जिवंत अनुभव सध्या अनुभवयास मिळत आहे. वडवणी शहर व तालुक्यातील हजारो आयडियाच्या ग्राहकांना आपला हँडसेट नेटवर्क अभावी असून अडचण नसून खोळंबा असा झाला आहे. ना कॉलिंग ना इंटरनेट दोन्ही सुविधा बंद असल्याने ग्राहकांची मोठी पंचाईत झाली आहे. अनेकांची महत्त्वाची कामे ही खोळंबली आहेत तर ऑनलाईन कामे इंटरनेट अभावी होत नसून कॉलिंगची सुविधा ही बंद असल्याने संपर्काअभावी ग्राहकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्किंग सिमकार्ड कंपनीमध्ये आयडिया या कंपनीला भारतातील सर्वाधिक वेगाने व सर्वाधिक ग्राहक असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र याच आयडिया कंपनीला आता घरघर लागली आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण मागील पाच दिवसांपासून वडवणी शहर व तालुक्‍यातील सर्वच ठिकाणी आयडिया नेटवर्कमध्ये मोठा बिघाड झालेला आढळून येत असून हजारो ग्राहकांचा एकमेकांशी कसलाच संपर्क होत नसून ना कॉलिंग ना इंटरनेट या दोन्ही सुविधा बंद असल्यामुळे सर्व ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हॉट ऍन आयडिया सरजी असे म्हणत स्वतःचा धिंडोरा पिटविणाऱ्या आयडियाला त्रस्त वडवणीकर म्हणू लागले आहेत की, आयडिया आता नकोच सरजी. परिणामी आयडियाचे हजारो ग्राहक दुसऱ्या दर्जेदार नेटवर्कची सुविधा स्विकारण्याच्या मानसिकतेत आहेत. तरी आयडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व संबंधितांनी वडवणी तालुक्यातील आयडियाच्या कोलमडलेल्या नेटवर्कमध्ये तात्काळ सुधारणा करून ग्राहकांना तत्पर व जलद सेवा देण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात. जेणेकरून किमान राहिलेले ग्राहक तरी टिकविणे आयडियाला सोपे जाईल. अन्यथा जर अशीच दळभद्री सेवा सुरू राहिली तर रिचार्ज विक्रेते सोडता इतर एकही ग्राहक आयडियाचा वडवणी तालुक्यात शिल्लक राहणार नाही एवढे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published.