Home » ब्रेकिंग न्यूज » नायक संतोष आर्सुळ यांचा जन्मभूमीत सपत्नीक सत्कार

नायक संतोष आर्सुळ यांचा जन्मभूमीत सपत्नीक सत्कार

नायक संतोष आर्सुळ यांचा जन्मभूमीत सपत्नीक सत्कार

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा – भारतीय सैन्य दलात नायक म्हणून 19 वर्षे सेवा पुर्ण केलेल्या बेनसुर ता.पाटोदा येथील संतोष हरिश्चंद्र आर्सुळ यांचा सेवानिवृत्तीबद्दल ग्रामस्थांतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. अनेक जवान सैन्यदलात असलेल्या बेनसूर येथील नागरीकांनी सैन्यदलात काम करुन निवृत्त झालेल्या जवानांचा सत्कार करण्याचा पायंडा पाडला आहे.

संतोष हरिश्चंद्र आर्सुळ हे भारतीय सैन्यदरात सन 2000 साली रिक्रुड म्हणून भरती झाले होते. या 19 वर्षाच्या नोकरीत त्यांनी शिपाई, लान्स नायक व नायक या पदावर काम केले. या काळात बेळगाव, जम्मु काश्मिर, रांची (झारखंड), बिकानेर (राजस्थान) व चंदीगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय सैन्य दलात यशस्वी कामगिरी केली. 30 जून 2019 रोजी रात्री 12ः00 वाजते ते नायक या पदावरुन नित्त झाले. त्यामुळे यशस्वीरित्या देशसेवा केलेल्या संतोष आर्सुळ व त्यांची पत्नी मिरा यांचा बेनसूर ग्रामस्थांच्या वतीने गावातुन वाजत गाजत मिरवणुक काढून त्यांचा सपत्नीक सहृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी जामखेड पं.स.चे माजी सभापती डॉ.भगवानराव मुरुमकर, सेवाानिवृत्त प्राचार्य श्रीराम मुरुमकर,खरेदी विक्री संघाचे संचालक तात्यासाहेब आर्सुळ, शिवाजीराव काकडे,वानेवाडीचे सरपंच राजेंद्र येवले, माजी सरपंच नानासाहेब आर्सुळ,रावसाहेब आर्सुळ,सखाराम आर्सुळ, जालिंदर आर्सुळ, निवृत्त सैनिक राधाकिसन आर्सुळ, सरपंच पती राजेंद्र सगरे,विस्तार अधिकारी दत्तात्रय आर्सुळ,परसराम आर्सुळ यांच्यासह बेनसूर,भायाळा,थेरला येथील ना‌गरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.