नादब्रह्म संगीत विद्यालयाचा अंबिकानगर शाखेचा शुभारंभ.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या तिसऱ्या अंबिकानगर शाखेचा येथील पिंपरगव्हाण रोडवरील विठ्ठल मंदिराजवळ शुभारंभ करण्यात आला, प्रा.महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे गायन,तबला वादन आणि हार्मोनियम शिकवले जाणार आहे.
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्यांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक तबला वादन करून नाव नोंदवले आशा प्रा महेश कुलकर्णी यांच्या नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या अंबिकानगर शाखेचा पिंपरगव्हाण रोड भागातील विद्यार्थ्यांसाठी शुभारंभ करण्यात आला आहे.येथे शुक्रवार,शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सायंकाळी 4-30 ते 9 असे गायन ,वादन शिकवले जाणार आहे.या विद्यालयाचा प्रारंभ येथील पत्रकार महेश वाघमारे, लक्ष्मीकांत खडकीकर, प्रा सतीश कुलकर्णी, महेश जोशी ,अनिल अष्टपुत्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या मार्फत संत सावता माळी चौक आणि धोंडीपुरा भागात विद्यालय चालवले जाते ज्याचा लाभ त्या त्या भागातील विद्यार्थी घेतात, अंबिकानगर भागातील नागरिकांनी या भागात संगीत शिकण्याची ओढ असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती त्यानुसार या विद्यालयाचा प्रारंभ करण्यात आला असून ,गायन ,वादनाची आवड असणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा महेश कुलकर्णी ( 9370620936 ) यांनी केले आहे.