Home » माझी वडवणी » दुष्काळी वडवणी तालुक्यासाठी राज पाटील यांचा “लढा”

दुष्काळी वडवणी तालुक्यासाठी राज पाटील यांचा “लढा”

दुष्काळी वडवणी तालुक्यासाठी राज पाटील यांचा “लढा”

डोंगरचा राजा /आँनलाईन

– वडवणी तालुक्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटपाचा उपक्रम जोमात.

— दुष्काळाने व्याकुळ झालेल्या वडवणी तालुक्यातील शेतकरयांच्या लेकरांना मदत करण्यासाठी अॅड. राज पाटील हे सामाजिक नेते धावुन आले आहेत. तालुक्यात सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहा हजाराहून अधिक बालकांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला असुन “लढा दुष्काळाशी” हा उपक्रम तयार करून त्यांनी  आतापर्यंत चाळीस शाळेतील बालकांना साहित्य वाटप करण्यात केले आहे. अॅड. राज पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

वडवणी तालुक्यात मागील तीन वर्षापासुन दुष्काळी परस्थिती आहे. या वर्षी तर शेतकरयांचा खर्च देखील उत्पन्नातुन निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक आडचणीत आहेत. त्यातच या वर्षीही पाऊस चांगला पडला नसल्याने शेतकरयांचे अर्थकारण बिघडले आहे. अडचणीत असलेल्या शेतकरयांच्या लेकरांना दिलासा देण्यासाठी सामाजिक नेते अॅड. राज पाटील यांनी “लढा दुष्काळाशी” या नावाने उपक्रम तयार केला. त्यांचे मिञ पञकार अशोक निपटे, आदर्श गावचे सरपंच माऊली सुरवसे, अॅड. माधव शेंडगे, सभापती गणेश शिंदे, पञकार अनिल वाघमारे, सुधाकर पोटभरे आदी मंडळींनी नियोजन केले. या नियोजनाला युवा नेते जयसिंह सोळंके, सभापती गणेशराव शिंदे, प्रा. सतिश मगर, प्रा. सुसेन महाराज नाईकवाडे, डाॅ. प्रविण सावंत, माजी आमदार मोहनराव सोळंके, रोटरी क्लब वडवणी, विनोद जोशी, पीएनजी ज्वेलर्स, एकनाथ झाटे, महेश सावंत, गोकुळ गवारे, अनंत बादाडे, प्रदीप गिलबिले आदी शेकडो मंडळीनी साथ देत भरीव निधी अॅड राज पाटील यांच्याकडे दिली. या निधीतुन वह्या, पेन, पेन्सील, खोडरबर, शाॅपनर हे साहित्य खरेदी करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात आवश्यक असणारया पुर्ण वह्या व साहित्य वाटप करण्यात आले. आतापर्यंत चाळीस शाळेत हे साहीत्य वाटप केले असुन उर्वरीत सत्तर शाळेत पुढील पंधरवाड्यात हे साहित्य वाटप करण्यात येणार आहेत.
———–
अॅड राज पाटील यांनी शेतकरयांना दिलासा देण्यासाठी उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
———

पंधरा लाखाचा खर्च

अॅड राज पाटील यांनी हाती घेतलेल्या लढा दुष्काळाशी या उपक्रमात दहा हजाराहून अधिक बालकांना शालेय साहित्य देण्यासाठी सुमारे पंधरा लाखाहून अधिक खर्च होणार आहे. दानशुर लोकांनी या पविञ कार्यात दान द्यावे असे अवाहन लढा दुष्काळाशी च्या टीमने केले आहे.

——

वडवणी तालुक्यातील  विविध शाळेत शालेय साहीत्य वाटप करताना अॅड राज पाटील व टीम सोबत जयसिंह सोळंके

Leave a Reply

Your email address will not be published.