Home » ब्रेकिंग न्यूज » तेजस्विनी प्रकल्पातून 528 कोटी रुपयांचा निधी- ना.पंकजा मुंडे

तेजस्विनी प्रकल्पातून 528 कोटी रुपयांचा निधी- ना.पंकजा मुंडे

तेजस्विनी प्रकल्पातून 528 कोटी रुपयांचा निधी
– ना.पंकजा मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – ग्रामीण भागातील गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी नवतेजस्विनी उपक्रम राज्य शासन राबविणार असून त्यासाठी सुरुवातीस निधी ,प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 528 कोटी रुपये मंजूर केले आहेत असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास , महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम )च्या माध्यमातून परळी येथे महिला उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना मंत्री श्रीमती मुंडे बोलत होत्या यावेळी कार्यक्रमास माविमच्या कार्यकारी व्यवस्थापक श्रद्धा जोशी, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय , माविमचे समन्वय अधिकारी एस बी चिंचोलीकर, व्यवस्थापक महेश कोकरे , उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी न व तेजस्विनी उपक्रमातून प्रातिनिधिक तेरा महिला बचत गटांना निधीचे वितरण धनादेशाद्वारे मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले तसेच लाभार्थी महिलांना शेळ्या पालन, बकरी पालन, कुकुट पालन आदी व्यवसायांसाठी शेळ्या ,बकरी व कोंबडीच्या पिलांचे वितरण करण्यात वाटप करण्यात आले.
यावेळी मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या महिला बचत गटाच्या चळवळीतून महिलांच्या सक्षमीकरणात बरोबरच बीड जिल्ह्याचे शेतकरी आत्महत्येचा जिल्हा चित्र बदलण्यात यश मिळाले आहे .त्यामुळे ही चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी नव तेजस्विनी उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या बचत गटांनी दुष्काळात देखील कर्ज परतावा उत्तम रीतीने केला आहे .अल्पसंख्याक महिलांनीदेखील बचत गटांच्या माध्यमातून घराबाहेर पडून व्यवसायाच्या नवीन संधी चा लाभ घ्यावा नवतेजस्विनी प्रकल्पातील 100 कोटी अल्पसंख्याक महिला बचत गटांसाठी ठेवण्यात आले आहेत असे यावेळी श्रीमती मुंडे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या बचत गटाच्या चळवळीतून महिलांचे जीवन आमूलाग्र बदलले आहे तांड्यांवर राहणारी आणि ऊसतोडीसाठी जाणारी विमल जाधव ही महिला बचत गटाच्या माध्यमातून आज हजारो महिलांना सक्षम करण्यासाठी धडपडते आहे स्वतः अशिक्षित अज्ञानी असतानादेखील सुरुवातीच्या काळात प्रयत्न द्वारे त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या त्यांच्या प्रयत्न द्वारे त्यांनी महालक्ष्मी सरस सारख्या प्रदर्शनात एका वेळी साडेसात लक्ष रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला अमेरिकेसारखा परदेश दौरा केला यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. यासाठी महिलांनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे असे पालक मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.
या चळवळीतून अशिक्षित महिला देखील स्वतःचे जीवन बदलू शकतात असे सांगून महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित, पीडित, अल्पसंख्यांक घटकांच्या विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे यातूनच अल्पसंख्यांकांच्या विकासासाठीचे राज्य शासन देखील उपक्रम हाती घेत आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव तेजस्विनी मान्यता दिली आहे असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या सुरुवातीच्या काळात काम करताना महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली कसा आणता येईल हा प्रश्न मनात येत होतं ग्रामीण भागातील या महिलांना पाण्यासाठी दिवसभर भटकावं लागायचं यातूनच जलयुक्त शिवार योजनेचे जन्म घेतला. दुष्काळामुळे काही का पाण्याची समस्या झाली असेल पण पाऊस झाला तर या जलयुक्त कामातील प्रकल्पांमध्ये चांगले पाणीसाठे निर्माण होतील शेतकरी आत्महत्यांमुळे घरी राहणाऱ्या शेतकरी पत्नीस जीवन संघर्षाचा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा, त्यांना सक्षम करण्यासाठीच महिला बचत गट चळवळ मी हाती घेतली यामुळे महिलांचा नाकारला जाणारा आवाज आज मोठा होत आहे , असे प्रतिपादन मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.