Home » माझा बीड जिल्हा » भर दुष्काळात जगविली आंब्याची बाग 

भर दुष्काळात जगविली आंब्याची बाग 

भर दुष्काळात जगविली आंब्याची बाग 

अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन

 -अनेक अडचणीनंतरही ही झाडं जगली आणि म्हणूनच या झाडांचा हा पहिला वाढदिवस दिमाखात साजरा

गेली वर्षभर दुष्काळी परिस्थिती असताना ही नारायणऔटे या दासखेड च्या  शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून  झाडे जगवली.गेल्या वर्षी कृषी दिनी या शेतकऱ्याने 250 केशर आंबा लागवड शेतात केली मात्र गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याची कमतरता होती दिवाळी पासूनच सर्वत्र पाणीप्रश्न सुरु झाला होता अशा भयाण दुष्काळी परिस्थितीत या शेतकर्याने ह्या झाडाला जीव लावून देखभाल करून ही बाग जगविली याचाच आनंद म्हुणून  त्यांनी या झाडाचा चक्क वाढदिवसच साजरा केला     साजऱ्या झालेल्या वाढदिवसात नेहमीच्या वाढदिवसाप्रमाणे फुगे, संगीत इतकेच नव्हे तर केकही होता. पण, विशेष असे की, हा वाढदिवस कोणा एखाद्या व्यक्तिचा नव्हता तर, तो 250  केशर  आंबा झाडाचा होता,

दासखेड येथील औटे परिवार यांच्या कडुन झाडांना सजवण्यात आले. त्यांना फुगे बांधण्यात आले. परिसर स्वच्छ करण्यात आला. कारण या झाडांना लावून आता वर्ष झालंय.  या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी हा सगळा प्रकार परिसरातील नागरिकांनी केला. झाडांसमोर रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या. झाडांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ही झाडं जगवण्यासाठी ज्या लहान बालकांनी परिश्रम घेतले त्यांनीही झाडाच्या नावानं केकही कापला. कारण  तब्बल वर्षभरापूर्वी या परिसरात ही 250 केशर आंबा झाडं लावण्यात आली होती. अनेक अडचणीनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला. भयाण दुष्काळात या शेतकर्याने ही आंब्याची बाग जगविली ही प्रेरणादायी बाब आहे

त्यामुळं हा वाढदिवस साजरा करतांना  औटे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. कारण अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात. मात्र त्यांना जपण्याकडं दुर्लक्षच होत असतं,  मात्र या ठिकाणी झाडं लावण्यात आली आणि ती जगवण्यातही आली, अजूनही यांना बराच पल्ला गाठायचाय. मात्र, एक चांगली सुरुवात झाल्याचा आनंद झाडांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून पहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published.