Home » ब्रेकिंग न्यूज » नाथ महाराज पालखी सोहळा आज पाटोदा मुक्कामी

नाथ महाराज पालखी सोहळा आज पाटोदा मुक्कामी

नाथ महाराज पालखी सोहळा आज पाटोदा मुक्कामी

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — आषाढी वारीसाठी पैठण येथून मार्गस्थ झालेला श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा आज रविवार पाटोदा शहरात मुक्कामी येत असून सायंकाळी 6 च्या सुमारास हा पालखी सोहळा शहरातील शिवाजी चौक येथे दाखल होईल . गावकऱ्यांच्या वतीने स्वागत झाल्यानंतर हा पालखी सोहळा शिवाजी चौक, बाजारतळ, भामेश्वर मंदीर, रस्ता गल्ली मार्गे काळा हनुमान ठाणा येथे मुक्कामी पोहचेल .पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी शहरातील भामेश्वर मंदीर येथे जेवणाची व्यवस्था शरद देशमुख यांनी केली आहे. मुक्काम ठिकाणी सायंकाळी आरती, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात . संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याला पंढरपुरात मोठा मान आहे ,हा पालखी सोहळा शेकडो वर्षा पासून पाटोदा येथून जातो सोमवारी सकाळी हा सोहळा पुढे पारगाव कडे रवाना होतो. पारगाव येथे पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण पार पडते त्यानंतर पालखी दिघोळ मुक्कामी जाते.
——————————————————–
चौकट —-

पाटोदा शिरूरकरांना नाथ पावला . गेल्या शेकडो वर्षापासुन नाथ महाराज पालखी सोहळा हा पाटोदा शिरूर तालुक्यातील अनेक गावातून मार्गस्थ होतो या पालखी मार्गासाठी आमदार भीमराव धोंडे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून गेल्या वर्षी पासुन या पालखी मार्गाचे काम जोमाने सुरु असून ते लवकरच पूर्ण होईल .या मार्गामुळे पाटोदा शिरूर तालुक्यातील जवळपास साठ ते सत्तर किमी रस्ते चकाचक होणार असुन रस्त्याची दैना फिटली असून संत एकनाथांच्या कृपेने रस्ते चकाचक होणार आहेत ,त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील जनता आपल्याला नाथ पावला असेच म्हणत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.