Home » माझी वडवणी » लढा दुष्काळाशी उपक्रमाला दिला मदतीचा हात 

लढा दुष्काळाशी उपक्रमाला दिला मदतीचा हात 

लढा दुष्काळाशी उपक्रमाला दिला मदतीचा हात 

डोंगरचा राजा / आँनलाईन

— नऊ हजार बालकांना शालेय साहित्याच्या वाटपाचा शुभारंभ.

चिंचोटी – लढा दुष्काळाचा या अॅड. राज पाटील यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला असुन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा  हात  देत मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे नऊ हजार बालकांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात म तालुक्यातील चिंचोटी येथे शुक्रवारी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार मोहनराव सोळंके व युवा नेते जयसिंह सोळंके यांच्या हस्ते करण्यात आली.

वडवणी तालुक्यातील १०५ शाळेतील सुमारे नऊ हजार बालकांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते अॅड.  राज पाटील यांच्या लक्षात आला त्यांनी आदर्श गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर सुरवसे यांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. बीड, वडवणी तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या उपक्रमाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य यावेळी देण्यात आले. यावेळी पत्रकार अशोक निपटे, अनिल वाघमारे, सुधाकर पोटभरे, भैय्यासाहेब तांगडे, रामेश्वर गोंडे, पंचायत समिती सभापती गणेश शिंदे,  सरपंच अॅड.  माधव शेंडगे यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली देणगी अॅड. राज पाटील यांच्याकडे सुपूर्त केली जयसिंह सोळंके यांनी एक लाख चाळीस हजार रुपयांचा धनादेश दिला.  विद्या प्रबोधिनी क्लासेस बीड, ज्ञानयोग मंडळाचे माऊली दुसाने, मेडिकल असोसिएशन बीड, रोटरी क्लब वडवणी, फर्टीलायझर पीएनजी ज्वेलर्स बीड, नेटाफिम ड्रिप इरिगेशन बीड, सभापती गणेश शिंदे, पत्रकार विनोद जोशी, देवगावचे सरपंच माऊली सुरवसे, सरपंच माधवराव शेंडगे, पत्रकार रामेश्वर गोंडे, एकनाथराव झाटे, अशोक गोंडे  यांनी भरीव मदत केली. यावेळी मोहनराव सोळंके व जयसिंह सोळंके यांनी मार्गदर्शन केले. आपणही मदत करणार असल्याचे मोहनराव सोळंके यांनी जाहीर केले.  या कार्यक्रमाचे प्रस्तविक अॅड. राज पाटील, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी तर आभार रामेश्वर गोंडे यांनी मानले.
————————–
मदत करा—

वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १०५ शाळातील सुमारे  ९००० बालकांना ५४०००वह्या, पेन, पेन्सील व इतर साहित्य वाटप करण्याच्या या उपक्रमात समाजसेवक, दानशुरांनी पुढाकार घेऊन भरीव मदत द्यावी.
— अॅड. राज पाटील
—————————
वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे लढा दुष्काळाशी या उपक्रमाअंतगत शालेय मुलांना साहित्य वाटप करताना माजी आमदार मोहनराव सोळंके, जयसिंह सोळंके, अॅड. राज पाटील, अशोक निपटे, माऊली सुरवसे, अनिल वाघमारे, सुधाकर पोटभरे, रामेश्वर गोंडे, माधव शेंडगे

Leave a Reply

Your email address will not be published.