Home » महाराष्ट्र माझा » झारखंड येथील घटनेचा पाटोद्यात निषेध

झारखंड येथील घटनेचा पाटोद्यात निषेध

झारखंड येथील घटनेचा पाटोद्यात निषेध

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा — झारखंड राज्यात २४ वर्षीय तबरेज अन्सारी या मुस्लिम तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे तसेच मागील काही वर्षांपासून मुस्लिम समाजावर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याने या घटणांच्या निषेधार्थ पाटोदा येथे शुक्रवारी दुपारी नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी राज मोहम्मद चौक येथून रँली काढून पाटोदा तहसील कार्यालय येथे या घटनेच्या निषेधार्थ धरणें आदोलन केले .पाटोदा तहसीलदार रूपा चित्रक याना यावेळी निवेदन देण्यात आले ,माॅब लिचीग विरूध कडक कायदा करण्यात यावा, आरोपींवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली , या घटनेचा निषेध करून या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा दिली पाहिजे असे मनोगत यावेळी अनेकांनी व्यक्त केले, सर्व धर्मीय व सर्व पक्षीय नागरिक यावेळी उपस्थित होते.यावेळी आदोलकानीं तहसीलदार श्रीमती रुपा चित्रक यांना निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.