Home » माझा बीड जिल्हा » उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी पाण्डेय

उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी पाण्डेय

उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी पाण्डेय

डोंगरचा राजा / आँनलाईन

– खरीप हंगामातील 950 कोटी रुपये
पीककर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे
-जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

बीड – यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जासाठी जिल्ह्याला 950 कोटी रुपयाचे उदिष्ट निश्चित करण्यात आले असून बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरीत करावयाचे पीककर्जाचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी कर्ज वाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवणे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र निकम, नाबार्ड बँकेचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू पवार तसेच जिल्ह्यातील शासकीय खाजगी बँकांचे प्रतिनिध, विविध विकास मंडळांचे अधिकारी आणि जिल्हा मुद्रा समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, खरीप हंगामामध्ये जिल्हयात आतापर्यंत 9 हजार 689 खातेदार शेतक-यानां 85 कोटी रुपये वाटप पूर्ण झाले आहेत. विविध पीकनिहाय पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या संबंधित बँकांकडे प्राप्त होतात. पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करताना सप्टेंबर पूर्वी ही कार्यवाही होणे गरजेचे असून जुलै 2019 अखेर 80 टक्के पीक कर्जाचे वाटप केले जावे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, दुष्काळी परिस्थिती अथवा शासनाच्या विविध योजनातील लाभार्थ्यांसाठी देण्यात येणारी अनुदानातील रक्कम संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी बँकांनी अनुदानाचा रकमा कर्ज खात्यामध्ये जमा करून नयेत त्याचा लाभ संबंधितास मिळावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी दिले .
कृषी बरोबरच जिल्ह्यातील विविध घटकांसाठी शासन असंख्य योजना राबवत असून त्यामधून संबंधित व्यक्तीचा जीवनमान उंचावण्यासाठी अंमलबजावणी करणे गरजेचे असते. शासनाची संबंधित विविध महामंडळ, बचत गट आधीच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातो. यासाठी या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे असे श्री. पाण्डेय म्हणाले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी पिक कर्ज वाटपाच्या दृष्टीने जिल्ह्यातील बँकांना सूचित केल्याप्रमाणे बँकांच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शेतकरी जनजागृती कार्यक्रम घेतले जात असून त्यामधून शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना याचा उपयोग होऊ शकतो. यादृष्टीने पात्रताधारक शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे सादर करावेत, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी नाबार्डकडून पुढील वर्षासाठी जिल्ह्याचा कर्ज आराखडा याअंतर्गत पीककर्ज, शेती पूरक कर्ज आदीं बाबत जिल्ह्यातील प्राधान्या बाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत यावर्षी उमेद मधून 55 कोटी रुपये उद्दिष्ट ठरविण्यात आले असून यादृष्टीने बाबत सूचना कार्यवाही बाबत सूचना देण्यात आल्या. शेती पुरक योजना यावर्षीपासून जिल्हास्तरीय समितीच्या देखरेखीखाली राबविण्यात येणार असून या योजनेतून मासे पालन, कोंबडी पालन, दुग्ध जनावरांचे पालन आदींच्या कर्जाचे वितरण केले जाईल. जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून 457 प्रकरणांचे कर्ज मंजूर करून रक्कमा अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यात यामध्ये जिल्हा आघाडीवर आहे, अशी या वेळी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी मुद्रा समितीच्या अशासकीय सदस्यांनी जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्ह्यात मुद्रा योजनेचे काम 226 कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत 238 कोटी 50 लक्ष रुपये कर्ज प्रकरणी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्याचे सांगून सदर आकडेवारी ही उद्दिष्टाच्या तुलनेत 105 टक्के आहे, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.