योगासने करणे महत्वाच – जिल्हाधिकारी पाण्डेय
डोंगरचा राजा / आँनलाईन
— योग दिन उत्साहात साजरा..ताण तणावापासून मुक्त राहण्यासाठी योगासने करणे महत्वाचे
— जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
बीड – ताणतणावमुक्त राहण्यासाठी तसेच माणसाच्या निरोगी शरीरासाठी धक्काधकीच्या जीवणात तणावमुक्त राहण्यासाठी, शारीरिक व मानसिक क्षमता कायम राहावी यासाठी दररोज योगासने करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
योग हा पारंपारिक पध्दतीने पाच हजार वर्षापासून चालत आला असून पूर्वी वडीलधारी मंडळी योगाच्या माध्यमातून स्वत:ला निरोगी व तणावमुक्त ठेवण्यासाठी योगासने,ध्यान साधना करत असत, विद्यार्थ्यांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी व एकाग्रता साधण्यासाठी ध्यान साधना (मेडीस्टेशन) करणे ही काळाजी गरज झाली असून शारिरिक व मानसिक स्वस्थ्या निरोगी ठेवण्यासाठी ध्यान साधनेचा जीवनात नियमित उपयोग करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी विद्यार्थी अधिकारी,कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय आणि। पतंजली योग समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांण्डेय यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, दरवर्षी 21 जून रोजी अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. माणसाच्या जीवनात योगाचे अत्यंत महत्व असून आजची आपली जीवनशैली बदलल्यामुळे तरुण पिढी नेहमीच तणावाच्या वातावरणात वावरत असते यापासून मुक्त राहण्यासाठी योगासारखे दुसरे माध्यम नाही. प्रत्येक नागरिकांनी योगा केला पाहिजे. विद्यार्थ्याच्या शारीरीक व बौधिक विकासासाठी शाळा व महाविद्यालयातील तरुणाने योगा केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी योगगुरु यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतले. या योग दिनाच्या कार्यक्रमास नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर
,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रकाश अघाव पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी अरविंद विद्यागर, शिक्षणाधिकारी माध्यामिक भगवान सोनवणे,शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेश गायकवाड,योगगुरु विनायक वझे,पतंजली योग समितीचे बाबासाहेब कुडके, राज्य क्रीडा मार्गदर्शक अजय पवार , रमेश पोकळे, नितीन धांडे यांच्यासह शहरातील शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, क्रीडा संघटना, खेळाडू, पत्रकार, व्यवसायिक मोठया विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-