Home » ब्रेकिंग न्यूज » बीड जिल्हा रुग्णालयात जागतिक योग दिन साजरा

बीड जिल्हा रुग्णालयात जागतिक योग दिन साजरा

बीड जिल्हा रुग्णालयात जागतिक योग दिन साजरा

डोंगरचा राजा / ऑनलाइन

– २१ जुनला डॉक्टरांना योगाचे धडे.

बीड – २१ जुन शुक्रवार रोजी जिल्हा रुग्णालय बीड येथे जागतिक योग दिनाचे आयोजन आयुष विभाग मार्फत करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात योग महर्षी पतंजली प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या हस्ते झाली,तसेच डॉ.सुदाम मोगले व डॉ.रेवडकर यांनी उपस्थितांना योग प्रात्याक्षिके करून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या अंजली बहेनजी यांनी शांती संदेश दिला .

डॉ.अशोकजी थोरात यांनी कार्येक्रमा दरम्यान म्हणाले  कि  योग हा नित्यकरण्याचा उपक्रम आहे   जेणे करून त्यामुळे  दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होऊन स्थिरता प्राप्त होईल तसेच मी स्वतः याचा अवलंब करत आहे त्या मुळे मी माझ्या कर्मचारी वर्ग यांच्यावर कधीही रागवत नाही . व कुणाचे मन दुखणार नाही याची काळजी घेतो त्यामुळे मी नित्य काम करत असताना मला कुठलाही ताणाव निर्माण होत नाही व कर्मचारीही चांगले काम करतात असे सांगून सर्वाना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय डॉ.जयश्री बांगर,डॉ.शिंदे मदम  अधिकारी  व कार्यालयीन अधिकारी , एक्सरे विभागाचे श्री. सुरेश जाधव,श्री.रमेश सानप, कर्मचारी , नर्सिग कॉलेजच्या प्राचार्या शैलजा क्षीरसागर,सौ सानप,सौ.वैशाली देशमुख,सौ.वर्षा बडेकर ,सौ.शारदा डहाळे,सौ.शेळके  व प्रपाठक वर्ग , विद्यार्थिनी तसेच सर्व कर्मचारी वर्ग राष्ट्रीय आरोग्य अभियान हे उपस्थित होते,

जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी डॉ.सचिन एस. वारे, यांच्या नियोजनाखाली करण्यात आले तसेच  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.आनंद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, डॉ.स्नेहल बुरांडे , तसेच कर्मचारी श्री.आनंदकुमार श्रीमती ज्योती साळवे , सौ.शकुंतला वरवडे व आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.